अक्कलकोट - विद्यार्थ्यांनी सामाजिक बांधिलकिसाठी शाळेत केले ५० वृक्षांचे रोपण

राजशेखर चौधरी
गुरुवार, 16 ऑगस्ट 2018

अक्कलकोट - ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने शाळेतील सर्व माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन वागदरी ता.अक्कलकोट येथील एस एस शेळके प्रशालेत ५० वृक्षांच्या रोपणाचा कार्यक्रम राबवला गेला.

अक्कलकोट - ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने शाळेतील सर्व माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन वागदरी ता.अक्कलकोट येथील एस एस शेळके प्रशालेत ५० वृक्षांच्या रोपणाचा कार्यक्रम राबवला गेला.

यावेळी शाळेचे मुख्याध्यापक यांच्या मार्गदर्शखाली झालेल्या छोटेखानी कार्यक्रम संपन्न झाला यावेळी शाळेचे चेअरमन मल्लीनाथ शेळके, सचिव मलप्पा  निरोळी, शाळेचे संचालक बसवराज शेळके, अनिल देशमुख, पंचप्पा सोनकवडे, पुजारी सर, वाघमोडे सर, होटकर सर आदि शिक्षक उपस्थित होते. तसेच १९९७ बॅच माजी विद्यार्थी संजय घोळसगांव, धोंडपा नंदे, श्रीमंत भरमदे, सोमनाथ माशाळे, गजानन जिरगे, शरणा पाटील, शिवानंद कलबुर्गी, प्रशांत आगरखेड, प्रसाद वळसंग, शाणप्पा भैरामडगी, पिंटू चोळे, बमण्णा दुर्गे, निंगप्पा नडगेरी, गुरूनाथ हत्तीकाळे, परमेश्वर कणमुसे, कविराज घुगरे, काश्मीम बागवान व सोमनाथ ठोंबरे आदि माजी विद्यार्थ्यानी सहभाग नोंदवून आपल्या शाळेबदल आदर प्रेम व्यक्त केला.

आपल्या शाळेविषयीचे ऋण फेडण्याची संधी माजी विद्यार्थ्यांना मिळाली, तर शाळेचे रुपडे कसे बदलू शकते याचे उत्तम उदाहरण म्हणजे वागदरी येथील शेळके प्रशालेचे १९९७ बॅच च्या माजी विद्यार्थी या विद्यार्थिनी आगळ्या-वेगळ्या उपक्रमातून समाजापुढे नवा आदर्श निर्माण केला.१९९७ च्या माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन आपल्याच शाळेत वृक्षारोपण केले आपण याच शाळेत २२ वर्षाच्या शिकत असताना शाळेच्या परिसरात घनदाट गर्द झाडीमुळे शाळा परिसर विशेषतः पावसाळ्यात हिरवेगार प्रसन्न वातावरण असायचे पण काही वर्षापासून वागदरी शेळके प्रशालेत पूर्वी सारखे झाडी नाहीत असे १९९७ बॅच माजी विद्यार्थ्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यानी आपल्या बॅचकडून ५० विविध प्रकारचे झाडी घेऊन शाळेच्या आवारात स्वतः जाऊन वृक्षारोपण केले अनाठायी खर्चाला फाटा देऊन सर्व माजी विद्यार्थ्यांनी एकत्र पैसे जमा करुन हा आगळा वेगळा उपक्रम वागदरी शेळके प्रशालेत राबवला.यावेळी मुख्याध्यापक सुभाष आंदोडगी म्हणाले की आपण शिकलेल्या शाळेत वृक्षारोपण व शाळेला झाडी भेट देऊन आदर्श निर्माण केला या झाडाची योग्य संगोपन करण्याची जबाबदारी शाळेचा मुख्याध्यापक म्हणून घेतो आणि शाळेतील मुलाना विभागणी करुन लावलेल्या झाडाची झाडाची दत्तक योजना तयार करून झाडाची निगा घेतले जाईल.

Web Title: Planting of 50 trees done by the students for social work