इंदापूरातील वनात झाडांना व प्राण्यांना पाण्याची सोय

kalas
kalas

कळस - इंदापूर तालुक्यातील वन्यप्राण्यांसाठी व नव्याने लागवड केलेल्या झाडांना वनविभाग व शरयू फांऊडेशनतर्फे पाणी देण्याच्या उपक्रमाची 
सुरवात कळस वनक्षेत्रातून आज अध्यक्षा शर्मिला पवार यांच्या हस्ते करण्यात आली. वनविभागाच्या पुढाकारातून व शरयू फांउडेशनच्या मदतीने राबविण्यात येणाऱ्या उपक्रमामुळे दुष्काळी परिस्थितीत वन्यप्राणी व झाडांच्या पाण्याचा प्रश्न काही अंशी मार्गी लागण्यास मदत झाली आहे. या उपक्रमामुळे वन्यप्रेमींमधून समाधान व्यक्त होत आहे. 

यावेळी जिल्हा परिषद सदस्या वैशाली पाटील, सरपंच गणेश सांगळे, राजेंद्र निंबाळकर, डी. एन. जगताप, सुभाष शिंदे, विक्रम निंबाळकर, अमरसिंह मारकड, अमरजीत पाटील, विठ्ठल कांबळे, वनपाल अशोक नरुटे, वनरक्षक निखील गुंड, वनकर्मचारी ज्ञानदेव ससाणे, राजेंद्र कांबळे, मधुकर आगलावे आदी उपस्थित होते. 

तालुक्यातील कळस, बिरंगुडी, कडबनवाडी व्याहळी, कौठळी, शेळगाव, गोखळी, पोंदकुलवाडी, अकोले या भागात यंदा लागवड करण्यात आलेल्या झाडांना व वन्यप्राण्यांसाठी उपलब्ध पाणवठ्यांच्या ठिकाणांमध्ये पाणी सोडण्यात येणार आहे. वनामध्ये चिंकारा जातीचे हरणे, कोल्हे, लांडगे, तरस, ससे यांसारखे अनेक वन्यजीवांचा अधिवास आढळून येतो. सध्याच्या दुष्काळी परिस्थितीमुळे यंदा प्रथमच उन्हाळ्या अगोदरच वन्य प्राण्यांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न नोव्हेंबर महिन्यातच जाणवू लागला. यामुळे वनविभागाने पुढाकार घेत या प्राण्यांच्या पिण्याच्या पाण्याच्या सोईसाठी व यंदा लागवड केलेल्या झाडांसाठी पाणी उपलब्धता करण्याच्या दृष्टीने शरयू फांउडेशनची मदत घेतली आहे. यामुळे तालुक्यातील वनातील बहुतांश गावातील वनातील पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत झाल्याचे माहिती तालुका वनपरिक्षेत्र अधिकारी राहूल काळे यांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com