प्लॅस्टीक बंदीच्या अंमलबजावणीसाठी मोहोळ नगरपरिषद सज्ज

राजकुमार शहा 
शनिवार, 23 जून 2018

मोहोळ शहरात किराणा, स्टेशनरी, रासायनिक खते, हॉटेल्स, सौदर्य प्रसाधने यांची लहान मोठी मिळुन सुमारे चारशे दुकाने आहेत. प्रत्येक ठिकाणी कॅरीबॅगचा वापर होतोच आहे. पर्यावरणाचा समतोल रहावा यासाठी पर्यावरण मंत्रालयाने आजपासुन प्लॅस्टीक बंदीची कडक अंमलबजावणी सुरू  केली आहे. 

मोहोळ : शासनाने केलेल्या प्लॅस्टीक बंदीच्या अंमलबजावणीसाठी मोहोळ नगरपरिषद सज्ज झाली असुन, कारवाईसाठी आठ जणांचे पथक नियुक्त केले असल्याची माहिती नगराध्यक्ष रमेश बारसकर यांनी दिली. 

मोहोळ शहरात किराणा, स्टेशनरी, रासायनिक खते, हॉटेल्स, सौदर्य प्रसाधने यांची लहान मोठी मिळुन सुमारे चारशे दुकाने आहेत. प्रत्येक ठिकाणी कॅरीबॅगचा वापर होतोच आहे. पर्यावरणाचा समतोल रहावा यासाठी पर्यावरण मंत्रालयाने आजपासुन प्लॅस्टीक बंदीची कडक अंमलबजावणी सुरू  केली आहे. 

प्लॅस्टीक कप व इतर वस्तु वापरामुळे नागरीकांना दुर्धर आजाराला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे नवीन पिडीसाठी प्लॅस्टीक बंदीचा निर्णय अतिशय योग्य असल्याचे नगराध्यक्ष बारसकर यांनी सांगितले. दरम्यान येत्या दोन दिवसात सर्व व्यापाऱ्यांची बैठक आयोजित करुन त्यांना या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी सहकार्य करण्याचे अावाहन करण्यात येणार आहे, अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.

Web Title: plastic ban in Mohol