‘स्वच्छ कास’साठी सातारकर सज्ज

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 12 मे 2018

सातारा - सातारा ते कास या सुमारे २५ किलोमीटर अंतरातील रस्त्याच्या स्वच्छतेसाठी सातारकर सज्ज झाले आहेत. त्यासाठी ४०० हून अधिक नागरिकांची नोंदणी झाली आहे. प्लॅस्टिक मुक्तीच्या या महाअभियानाला रविवारी सकाळी सहा वाजता सुरवात होऊन साडेनऊ वाजेपर्यंत हे अभियान चालणार आहे. 

‘युनेस्को’चे जागतिक निसर्ग वारसास्थळाचे कोंदण लाभलेले कास पठार व साताऱ्याकरिता वरदायिनी ठरलेला कास तलाव परिसर प्लॅस्टिकमुक्त ठेवण्याचा संकल्प आहे. ‘सकाळ’च्या पुढाकाराने, लोकसहभागातून सुरू झालेल्या या अभियानांतर्गत कास प्लॅस्टिकमुक्त महाअभियान राबविण्यात येत आहे.

...असे चालणार अभियान
‘सकाळ’कडे नोंदणी झालेले गट व त्यांच्या नेमलेल्या अंतरातील प्लॅस्टिक कचरा वेचून सोबतच्या पिशव्यांमध्ये ठेवतील. रविवारी सकाळी सहा वाजता नेमलेल्या जागांवर नागरिक पोचून कामाला लागतील. 

प्रत्येक गट सुमारे दीड किलोमीटर अंतरातील कचरा वेचणार आहे. शिवाय नागरिकांचे काही गट कास बंगल्याजवळ सकाळी साडेसात वाजता स्वत:च्या वाहनाने पोचतील. स्वयंसेवकांच्या मार्गदर्शनाखाली कचरा वेचून झाल्यानंतर सर्व 

नागरिक कास बंगल्याजवळ 
जमतील. त्याठिकाणी अभिनेते सयाजी शिंदे, उपवनसंरक्षक अनिल अंजनकर आदींसह मान्यवरांच्या उपस्थितीत छोटेखानी कार्यक्रम होईल. 

...काय असेल कचऱ्यात 
खाद्यपदार्थांचे वेस्टन, प्लॅस्टिक पिशव्या, चॉकलेट-बडीशेपचे कागद, सिगारेट-गुटख्याची रिकामी पाकिटे, काचेच्या-प्लॅस्टिकच्या बाटल्या, यूज अँड थ्रोची ताटे-द्रोण, ग्लास, चमचे आदी न कुजणारा कचरा यात गोळा करण्यात येणार आहे. 

सहभागी संस्था, ग्रुप
मॅरेथॉन फाउंडेशन, बंधन बॅंक कर्मचारी वृंद, शाहूपुरी विकास आघाडीचे कार्यकर्ते, सिनर्जी नॅचरल योगा ग्रुप, गोलबाग मित्रमंडळ, रानवाटा निसर्ग मंडळ, सातारा वन विभाग, हेरिटेजवाडी ग्रुप, मन:शक्ती ग्रुप, सातारा केमिस्ट असोसिएशन, जैन सोशल ग्रुप, संस्कृती प्रतिष्ठान, स्पंदन ग्रुप, होमिओपॅथिक प्रसार संस्था, वात्सल्य फाउंडेशन, महाराणा मित्र मंडळ पाचगणी.  

...हे करावे
प्रत्येकाने स्वत:च्या वाहनाची सोय करावी. गर्दी टाळण्यासाठी शक्‍यतो ‘शेअरिंग’ पद्धतीने इतरांना सामावून घ्यावे. डोक्‍यावर टोपी, शक्‍यतो पायात बूट घालावेत. पाण्याची बाटली सोबत आणावी. निसर्गरम्य परिसरात फिरण्याचा व हे करताना श्रमदानाचा आनंद घेण्यासाठी सकाळी सहाची वेळ सर्वांनी पाळावी. त्यामुळे उन्हाचा त्रासही कमी होईल.

Web Title: Plastic Exemption Campaign kaas lake