प्लॅस्टिक वापर कारवाईत कऱ्हाड पुढे 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 29 ऑगस्ट 2018

कऱ्हाड - येथील पालिकेच्या आरोग्य विभागाने प्लॅस्टिकच्या पिशव्यांवर कारवाईत सातत्य राखले आहे. एप्रिलपासून सुमारे 50 पेक्षा  अधिक कारवाया केल्या आहेत. त्यात सुमारे 40 हजारांपेक्षाही जादा दंड वसूल केला आहे. शंभरपासून पाच हजारापर्यंत दंड करून पालिकेने प्लॅस्टिकवर कारवाई करणारी जिल्ह्यात सगळ्यात अग्रेसर पालिका म्हणून नाव मिळवले आहे. आगामी काळात गणेशोत्सवही प्लॅस्टिकमुक्त करण्याचे जाहीर केले आहे. त्याला व्यापाऱ्यांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. व्यापाऱ्यांनी काल प्लॅस्टिकच्या सजावटी पालिकेतच आणून जमा केल्या. 

प्लॅस्टिक बंदीच्या अनुषंगाने पालिकेने स्वतंत्र पथकच तयार केले आहे. त्या पथकाद्वारे पट्रोलिंग केले जाते. गस्त घालणाऱ्या पथकाला प्लॅस्टिकची माहिती मिळाली, की थेट त्यांच्यावर कारवाई होते. त्यात आरोग्य सभापती प्रियांका यादव या थेट घटनास्थळी भेट देऊन कारवाईचे आदेश देतात. कमीतकमी शंभर, तर जास्तीतजास्त पाच हजारांपर्यंतच्या पावत्या केल्या आहेत. त्यात 20 किलोपासून 500 ते 300 किलोच्या प्लॅस्टिकच्या पिशव्या, ग्लास जप्त करण्यात आले आहे. सहापेक्षा जास्त व्यापाऱ्यांना एक हजारपेक्षा जास्त दंड झाला आहे, तर तीन व्यापाऱ्यांना पाच हजारांचा दंड झाला आहे. 

हीच थीम घेऊन पालिकेच्या आरोग्य विभागाने येऊ घातलेला गणेशोत्सवही प्लॅस्टिकमुक्त करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यासाठी त्यांनी आवाहन केले आहे. त्यानुसार शहरातील व्यापाऱ्यांनी काल प्लॅस्टिकच्या सजावटीचे साहित्य पालिकेच्या आरोग्य विभागाकडे आणून जमा केले आहे. नागरिकांतूनही त्या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. ती स्थिती कायम ठेवण्यासाठी आरोग्य विभागही तत्पर राहिलेला दिसतो आहे. 

...अशी आहे कारवाईची स्थिती 
* पालिकेचा प्लॅस्टिक पिशव्यांवर कारवाईचा सपाटा 
* प्लॅस्टिक ठेवणाऱ्या व्यापाऱ्यांवर होते दंडात्मक कारवाई 
* कमीतकमी शंभर, तर जास्तीतजास्त पाच हजारांचाही दंड 
* प्लॅस्टिकमुक्त गणेशोत्सवाला व्यापाऱ्यांचा सकारात्मक प्रतिसाद 
* प्लॅस्टिकची सजावट केली पालिकेत जमा 

Web Title: plastic use in karad