महापौरपदावेळी खेळी; उपमहापौरवेळी आघाडीचा धर्म 

विजयकुमार सोनवणे
बुधवार, 4 डिसेंबर 2019

शिवसेना व बसपने दिला भाजपला कौल 
महापौर निवडीची प्रक्रिया सुरू झाल्यावर भाजपच्या 49 जणांसह शिवसेनेचे राजकुमार हंचाटे आणि बसपच्या स्वाती आवळे यांनी भाजपला कौल दिला. शिवसेनेच्या उर्वरित नगरसेवकांनी मात्र तटस्थ राहण्याची भूमिका घेतली. एमआयएमच्या शेख यांना आठ मते मिळाली. यन्नम यांना भाजपच्या संख्याबळापेक्षा दोन मते जास्त मिळाली. त्यांच्या निवडीची घोषणा झाल्यावर भाजपच्या नगरसेवकांनी एकच जल्लोष केला. 

सोलापूर ः महापौर निवडीच्या वेळी तटस्थ राहून "राजकीय खेळी' करणाऱ्या शिवसेनेने उपमहापौर निवडीवेळी मात्र आघाडीचा धर्म पाळत कॉंग्रेसच्या उमेदवाराला मतदान केले. दरम्यान, या निवडणुकीत तटस्थ राहण्याची घोषणा केलेल्या एमआयएमने दोन्ही निवडणुकीत उमेदवारी कायम ठेवीत एकाकी झुंज दिली. 

आधी हे वाचा.... सोलापूरच्या महापौरपदी यन्नम, उपमहापौरपदी काळे 

प्रतिमेत याचा समावेश असू श्‍ाकतो: १६ लोक, Sanjayji Koli, Rajesh Kale आणि Lakhan Adate समाविष्टित, लोक हसत अाहेत, लोकं उभी आहेत, लोकं बसली आहेत आणि आंतरिक

एमआयएमने ठेवली उमेदवारी कायम 
महापौरपदाचे आरक्षण जाहीर झाले आणि त्यानंतर राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आली. त्या धर्तीवर सोलापूर महापालिकेतही महाविकास आघाडी करण्याचे नियोजन करण्यात आले. त्यानुसार बैठकाही झाल्या. गणितं घातली गेली, आकडेमोडही झाली. महाविकास आघाडीचा महापौर येणार हे निश्‍चित झाले तर आघाडीस पाठिंबा देण्याचे एमआयएम आणि वंचितनेही निश्‍चित केले. मात्र उमेदवारीवरून मतभेद झाले आणि महाविकास आघाडीत फूट पडली. एमआयएमने तटस्थ राहण्याची भूमिका घेत त्यावर शिक्कामोर्तब केले. प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रियेला सुरू झाल्यावर भाजपचे सर्व नगरसेवक सभागृहात होते. एकूण 102 नगरसेवकांपैकी 98 जणांनी मतदान प्रक्रियेत सहभाग घेतला. शिवसेनेच्या दोन नगरसेविका गैरहजर होत्या. कॉंग्रेसच्या परवीन इनामदार सौदी अरेबियाला गेल्याने, तर तौफिक शेख कारागृहात असल्याने गैरहजर होते. कॉंग्रेसच्या फिरदोस पटेल आणि शिवसेनेच्या सारिका पिसे यांनी उमेदवारी मागे घेतल्यावर, एमआयएमच्या शहाजीदाबानो शेखही मागे घेतात का यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न करण्यात आले. मात्र एमआयएमने उमेदवारी कायम ठेवली. 

हेही वाचा.... 55 वर्षांत सोलापूरात झाले इतके महापौर 

 

प्रतिमेत याचा समावेश असू श्‍ाकतो: ७ लोक, Sagar Bhosle समाविष्टित, लोकं उभी आहेत आणि बाहेरील

 

शिवसेनेने पाळला आघाडीचा धर्म 
उपमहापौर निवडणुकीच्या वेळी मात्र शिवसेनेने महाविकास आघाडीचा धर्म पाळण्याचे जाहीर केले आणि त्यानुसार त्यांनी कॉंग्रेसच्या उमेदवार फिरदोस पटेल यांना मतदान केले. मात्र त्यावेळी नगरसेवक देवेंद्र कोठे आणि गुरुशांत धुत्तरगावकर सभागृहाबाहेर गेले होते. पीठासीन अधिकाऱ्यांनी दोन वेळा पुकारा केला, मात्र कोणीही मतदानासाठी न आल्याने त्यांनी निकाल घोषित करत भाजपच्या राजेश काळे यांना विजयी घोषित केले. 

हे आवर्जून पहा..... महापौर निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया (VIDEO) 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Play during mayor; The leading religion during the deputy mayor politics