कोल्हापूर ते कृष्णा नाक्यापर्यंतच्या रस्त्याची चौकशी व्हावी - झाकीर पठाण

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 25 जून 2018

कऱ्हाड : माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी विशेष रस्ता अनुदानातून मंजूर करून आणलेल्या कोल्हापूर ते कृष्णा नाक्यापर्यंतच्या अकरा कोटीच्या रस्त्याच्या कामाची चौकशी करावी, अशी मागणी आमदार चव्हाण यांचे समर्थक झाकीर पठाण यांनी जिल्हाधिकारी श्र्वेता सिंघल व भाजपचे शहराध्यक्ष एकनाथ बागडी यांनी प्रांताधिकारी हिमत खराडे यांच्याकडे केली आहे. एकाच रस्त्याच्या कामाच्या चौकशीसाठी कॉग्रेस व भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी वेगवगेळ्या अधिकाऱ्यांकडे मागणी केली आहे. त्यामुळे शहरात खळबळ उडाली आहे. 

कोल्हापूर ते कृष्णा रस्त्याचे काम झाले म्हणजे नेमके काय काम झाले. त्याचा खर्च किती आला, ठेकेदाराने केलेल्या कामाचा दर्जा तपासला का, अशी मागणी पठाण व बागडी यांनी केली आहे. दोघांनाही त्यांच्यापरिने तीव्र आंदोलन छेडून उपोषणास बसण्याचा इशाराही दिला आहे. पालिकेत सध्या भाजपच्या नगराध्यक्षा आहेत. सत्तेत असलेल्या भाजपच्याच शहराध्यक्षांनी रस्त्याच्या कामाबाबत शंका व्यक्त करत त्या विरोधात आंदोलन छेडण्याचा इशारा दिल्याने पालिका वर्तुळात त्याची जोरदार चर्चा आहे. श्री. बागडी यांनी प्रांताधिकारी खराडे यांना निवेदन दिले आहे. त्यात अकरा कोटीचे काम होणाऱ्या कोल्हापूर ते कृष्णा नाक्यापर्यंतच्या रस्त्याच्या कामाबाबात बऱ्याच तक्रारी आहेत. त्याचा दर्जा व त्यावर झालेला खर्च याची सविस्तर माहिती घेवून त्या कामाची चौकशी करावी, अशी मागणी केली आहे. 

आमदार चव्हाण यांचे समर्थक व कॉग्रेसचे अल्पसंख्याक विभागाचे जिल्हाध्यक्ष पठाण यांनाही याच मुद्द्याला धरून जिल्हाधिकारी सिंघल यांच्याकडे अकरा कोटीच्या रस्त्याच्या कामाबाबत चौकशी करण्याची मागणी केली आहे. ती नझाल्यास उपोषणास बसण्याचा इशारा दिला आहे. पालिकेने या कामाची निवीदा ज्यांना दिली. त्यानी ते काम तितक्या ताकदीन केलेले नाही, अशी शंका त्यांनी निवेदनात व्यक्त केली आहे. रस्ता, दुभाजक, आरसीसी गटर आदी कामे मुदतीत झालेली नाहीत. कामाचा दर्जा खराब आहे. पालिकेचे प्रत्यक्ष कामावर भेट देणाऱ्या अभियंत्यांनाही त्याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे शासनाच्य़ा पैशाचा गैरवापर झाला आहे. त्यामुळे त्या कामाची चौकशी विशेष समिती नेमूण करावी. अन्याथा जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयासमोर उपोषमास बसण्याचा इसारा त्यांनी दिला आहे. 

Web Title: please conduct inquiry of kolhapur to krishna naka road