एफआरपीची रक्कम द्या अन्यथा आंदोलन

राजकुमार शहा 
सोमवार, 18 जून 2018

मोहोळ : मोहोळ तालुक्यातील सन 2017-18 या गळीत हंगामातील ज्या साखर कारखान्यानी ऊसाच्या एफआरपीची रक्कम अद्याप दिली नाही. ही रक्कम त्यांनी ती तातडीने द्यावी अन्यथा येत्या 25 जुन रोजी माजी आमदार राजन पाटील यांच्या उपस्थीतीत तहसील कार्यालयासमोर अंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादी किसान सभेच्या वतीने देण्यात आला आहे. तशा आशयाचे निवेदन तहसीलदारांना दिले आहे.

या संदर्भात अधिक माहिती अशी की, चालु गळित हंगामात ऊसाचे विक्रमी उत्पादन झाले आहे. तालुक्यातील कारखान्याबरोबरच तालुक्याच्या बाहेरील कारखान्याकडेही ऊस गाळपास गेला आहे. ऊस गळीतास गेल्यावर पंधरा दिवसात शेतकऱ्यांना त्यांच्या ऊसाचे पैसे देणे बंधनकारक आहे. मात्र, कारखाने बंद होऊन तीन महिन्याचा कालावधी लोटला असून, अद्यापही शेतकऱ्यांना त्यांच्या ऊसाचे पैसे मिळाले नाहीत. तसेच कारखान्याकडे असणारी इतर देयके ही अद्याप दिली नाहीत.

कारखान्यांनी ती त्वरीत द्यावीत अन्यथा माजी आमदार राजन पाटील यांच्या उपस्थीतीत किसान सभेच्या वतीने आंदोलनाचा इशारा दिला आहे. निवेदनावर राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष प्रकाश चवरे ज्ञानेश्वर चव्हाण भारत सुतकर पंडीत ढवण ब्रम्हदेव चव्हाण एजाज तलफदार सुदर्शन कादे विनायक सरवदे आदी उपस्थीत होते.

Web Title: Please give the FRP amount otherwise protest