काँग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेत मोठ्या संख्येने उपस्थित रहा : आ. सिद्धराम म्हेत्रे

akkalkot
akkalkot

अक्कलकोट : प्रदेश काँग्रेस कमिटीने आयोजित केलेल्या जनसंघर्ष यात्रेचे 4 सप्टेंबरला अक्कलकोट तालुक्यात आगमन होणार आहे. यावेळी जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांनी आज केले.

प्रदेश काँग्रेस कमिटीने आयोजित केलेल्या जन संघर्ष यात्रेचे 4 सप्टेंबरला अक्कलकोट तालुक्यात आगमन होणार आहे. या निमित्ताने भव्य जाहीर सभा व मोटार सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. याच्या नियोजनाकरिता अक्कलकोट काँग्रेस कार्यालयात सदर बैठकीचे आयोजन तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शंकर म्हेत्रे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते. यावेळी उपस्थित काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना आमदार सिद्धाराम म्हेत्रे बोलत होते.

ते म्हणाले की, शेतकरी, कष्टकरी, कामगार, नोकरदार, व्यापारी हे सर्वच संकटात सापडले आहेत. मोदी सरकारमुळे अच्छे दिन येणार असे म्हटले होते पण अच्छे दिन कोणालाच आले नाहीत. नोटबंदीमुळे देशाचा विकास दर घटला आहे. काँग्रेसमूळे देशाचा विकास दर वाढला होता. नोटा बंदीमूळे देश पुन्हा मागे गेला आहे. हे सरकार उलथून टाकण्यासाठी काँग्रेसच्या वतीने आयोजित जनसंघर्ष यात्रेत मोठ्या संख्येने जनतेने उपस्थित रहावे असे आवाहन आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांनी केले.

यावेळी जिल्हा परिषद कृषी सभापती मल्लिकार्जुन पाटील, मंगला पाटील, सुनीता हडलगी, महेश जानकर, अश्पाक बळोरगी, संजय गायकवाड, विलास गव्हाणे, महिबूब मुल्ला, भीमा कापसे, सद्दाम शेरीकर, आनंद सोनकांबळे, गुरुशांत ढंगे, सिध्दार्थ गायकवाड, रईस टिनवाला, दिलीप बिराजदार, सातलींग शटगार, अरुण जाधव, शैलेश विभूते, आदींची या प्रसंगी प्रमुख उपस्थिती होती.जन संघर्ष यात्रा यशस्वी करण्यासाठी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले.

यावेळी पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी जनसंघर्ष यात्रा यशस्वी कारण्याचा निर्धार व्यक्त केला. या बैठकीस रामचंद्र गद्दी, विश्वनाथ हडलगी, श्रीशैल दुधगी, महादेव होटकर, अप्पू बिराजदार, दिलीप काजळे, श्रीशैल भुसणगी, सिध्दाराम कोडले, सातलींग गुंडरगी, काशिनाथ कुंभार, मुबारक कोरबु, बाजीराव खरात, पांडुरंग राठोड, पांडुरंग चव्हाण, काशिनाथ गोळे, शिवप्पा कुंभार, रामचंद्र समाणे, बसवराज अल्लोळी, नबीलाल बागवान, बबन पवार, नितीन ननवरे, स्वप्नील दोशी, सुरेश माशाळे, धोंडप्पा यळमेली, धनराज धनशेट्टी, सिध्दाराम भंडारकवठे, सुभाष पुजारी, सुनील इसापुरे, राजू पाटोळे, शिवपुत्र हळगोदे, यांच्या सह अक्कलकोट तालुका व विधानसभा मतदार संघातील जिल्हा परिषद व पंचायत समितीचे सभापती, उपसभापती, सदस्य, नगरसेवक, ग्रामपंचात सरपंच, उपसरपंच, सदस्य, काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com