तासगावला स्मार्ट सिटी करण्यासाठी भाजपला मतदान करा - चंद्रकांत पाटील

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 20 नोव्हेंबर 2016

तासगाव - तासगावच्या सर्वांगीण विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, तासगाव शहराला स्मार्ट सिटी बनविण्यासाठी भाजपला मतदान करावे, असे आवाहन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी येथे प्रचार सभेत केले. सर्वसामान्यांचा विकास हेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ध्येय असल्याचे ते म्हणाले.

तासगाव - तासगावच्या सर्वांगीण विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, तासगाव शहराला स्मार्ट सिटी बनविण्यासाठी भाजपला मतदान करावे, असे आवाहन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी येथे प्रचार सभेत केले. सर्वसामान्यांचा विकास हेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ध्येय असल्याचे ते म्हणाले.

तासगाव नगरपालिका निवडणुकीसाठी भाजपच्या पॅनेलच्या प्रचारासाठी पालकमंत्री पाटील यांनी शहरात कालगावकर मंगल कार्यालय, मुस्लिम मोहल्ला, डबास गल्ली येथे सभा आणि बैठका घेतल्या. यावेळी खासदार संजय पाटील, मकरंद देशपांडे, भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, नगराध्यक्षपदाचे उमेदवार डॉ. विजय सावंत, शहराध्यक्ष माणिकराव जाधव आदी उपस्थित होते.

मंत्री पाटील म्हणाले, 'मतदारांकडून मते घेताना त्यांची कामे करण्याची जबाबदारीही आमची आहे. आमचे नगरसेवक नगराध्यक्षांनी ही जबाबदारी पाळली नाही तर त्यांचे राजीनामे घेऊ. भाजपची भूमिका सर्वसामान्यांचा विकास अशीच असल्याचे सांगून, दलित आणि मुस्लिम समाजाचा वापर केवळ मतांसाठी करून घेतला, गरीब गरीबच राहिला पाहिजे अशी भूमिका कॉंग्रेसची होती, जाती जातींत फूट पाडण्याचे काम कॉंग्रेसने केले. आज जातीयवादी कोण आहे हे दाखवून देण्याची वेळ आली आहे.''

खासदार संजय पाटील यांनी तासगावच्या विकासात कमी पडणार नाही असा शब्द देतो, मतदारांनी टाकलेल्या विश्‍वासाला तडा जाऊ देणार नाही, अशी ग्वाही दिली. यावेळी डी. ए. माने, माजी नगराध्यक्ष जाफर मुजावर आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्र्यांची 22 ला तासगावात सभा
तासगाव नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर 22 नोव्हेंबरला दुपारी 1 वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा निश्‍चित झाल्याचे पालकमंत्री पाटील यांनी जाहीर केले.

Web Title: Please vote for the BJP to Smart City Tasgaon