सोलापुरातील सोरेगावला साकारणार पंतप्रधान आवास योजना 

विजयकुमार सोनवणे
रविवार, 15 जुलै 2018

नगरोत्थानमधून होणार 13 रस्ते 
महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान महाअभियानांतर्गत 13 रस्ते होणार आहेत. त्यामध्ये इंचगिरी मठ ते मोदी रेल्वे भुयारी मार्ग, सुनीलनगर ते विठ्ठलनगर ते बसवेश्‍वरनगर, राजस्वनगर ते प्रतापनगर, नागू नारायणवाडी ते डोणगाव रस्ता व पोटफाडी चौक ते ऑफिसर्स क्‍लब (16.71 कोटी रुपये), सात रस्ता ते रूपाभवानी मंदिर, विद्यानगर ते दहिटणे, महालक्ष्मी मंदिर ते राठी टेक्‍स्टाइल, मित्रनगर शेळगी ते दहिटणे, 256 गाळा ते गोंधळे वस्ती, न्यू पुना नाका ते सायन्स सेंटर, मुरारजी पेठ जैन मंदिर ते आइस फॅक्‍टरी ते हिरज रोड ते खमितकर कॉम्प्लेक्‍स (12.63 कोटी), वीर सावरकर चौक ते सात रस्ता (3.29 कोटी रुपये) या रस्त्यांचा समावेश आहे. 

सोलापूर : सोरेगाव येथे महापालिकेच्या जागेवर पंतप्रधान आवास योजना राबविण्यासह अभिनेता नाना पाटेकर, मकरंद अनासपुरे, सयाजी शिंदे व अक्षयकुमार तसेच प्रिसिजनचे यतीन व डॉ सुहासिनी शहा या दांपत्यांना मानपत्र देण्याचे प्रस्ताव सर्वसाधारण सभेकडे पाठविण्यात आले आहेत. 

केंद्र शासन पुरस्कृत आवास योजनेंतर्गत सर्वांसाठी घरे हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. सोरेगाव येथे 23 हजार 712 चौरस मीटर जागा महापालिकेस उपलब्ध झाली आहे. त्या ठिकाणी हा प्रकल्प राबविण्याचे प्रस्तावित आहे. त्या ठिकाणी सार्वजनिक-खासगी भागीदारी पद्धतीने हा प्रकल्प राबविला जाणार आहे. सभेत हा प्रस्ताव मंजूर झाल्यावर त्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. 

दुष्काळग्रस्त शेतकरी व आत्महत्या केलेल्या शेतकरी कुटुंबीयांसाठी अहोरात्र झटणारे अभिनेते नाना पाटेकर, मकरंद अनासपुरे, सैनिकांच्या कुटुंबीयांना मदत देणारे अक्षयकुमार, हरितक्रांतीसाठी प्रयत्न करणारे अभिनेते सयाजी शिंदे आणि सोलापुरातील यशस्वी उद्योजक प्रिसिजन कॅमशाफ्ट्‌सचे यतीन व डॉ. सुहासिनी शहा यांना मानपत्र देण्याचा प्रस्ताव गुरुशांत धुत्तरगावकर व प्रथमेश कोठे यांनी दिला आहे. 

नगरोत्थानमधून होणार 13 रस्ते 
महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान महाअभियानांतर्गत 13 रस्ते होणार आहेत. त्यामध्ये इंचगिरी मठ ते मोदी रेल्वे भुयारी मार्ग, सुनीलनगर ते विठ्ठलनगर ते बसवेश्‍वरनगर, राजस्वनगर ते प्रतापनगर, नागू नारायणवाडी ते डोणगाव रस्ता व पोटफाडी चौक ते ऑफिसर्स क्‍लब (16.71 कोटी रुपये), सात रस्ता ते रूपाभवानी मंदिर, विद्यानगर ते दहिटणे, महालक्ष्मी मंदिर ते राठी टेक्‍स्टाइल, मित्रनगर शेळगी ते दहिटणे, 256 गाळा ते गोंधळे वस्ती, न्यू पुना नाका ते सायन्स सेंटर, मुरारजी पेठ जैन मंदिर ते आइस फॅक्‍टरी ते हिरज रोड ते खमितकर कॉम्प्लेक्‍स (12.63 कोटी), वीर सावरकर चौक ते सात रस्ता (3.29 कोटी रुपये) या रस्त्यांचा समावेश आहे. 

Web Title: pm home scheme in Solapur