मोदींनी साधला सोलापूरातील शेतकऱयांसोबत संवाद

तात्या लांडगे
बुधवार, 20 जून 2018

शेतकऱ्यांची संघटन चळवळ वाढावी, त्यांच्या शेतमालाला भाव मिळावा, यासाठीच शेतकरी कंपन्यांचा उपक्रम हाती घेतला आहे, महिला शेतकरी कंपनी म्हणून बोरामणीची यशस्विनी महिला शेतकरी कंपनी उत्कृष्ट काम करत आहे. शेतकरी कंपनीच्या उद्देशानुसार सुरु असलेले हे काम सातत्याने सुरु ठेवा, केंद्र शासन सदैव आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे असेल, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे झालेल्या शेतकरी संवादात बुधवारी (ता.20) या शेतकरी कंपनीच्या कामाचं कौतुक केलं. 
 

सोलापूर - शेतकऱ्यांची संघटन चळवळ वाढावी, त्यांच्या शेतमालाला भाव मिळावा, यासाठीच शेतकरी कंपन्यांचा उपक्रम हाती घेतला आहे, महिला शेतकरी कंपनी म्हणून बोरामणीची यशस्विनी महिला शेतकरी कंपनी उत्कृष्ट काम करत आहे. शेतकरी कंपनीच्या उद्देशानुसार सुरु असलेले हे काम सातत्याने सुरु ठेवा, केंद्र शासन सदैव आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे असेल, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे झालेल्या शेतकरी संवादात बुधवारी (ता.20) या शेतकरी कंपनीच्या कामाचं कौतुक केलं. 

तसेच, देशातील अन्य शेतकऱ्यांनीही कंपनीचं काम नक्की पाहावं, असे आवाहनही पंतप्रधान मोदी यांनी देशातील नऊ जिल्ह्यांतील काही मोजक्‍या शेतकऱ्यांशी संवाद साधला. त्यामध्ये सोलापूर जिल्ह्यातून दक्षिण सोलापुरातील यशस्विनी महिला शेतकरी कंपनीच्या अध्यक्षा सौ. अनिता माळगे यांच्याशी त्यांनी संवाद केला. यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी बसवराज बिराजदार, उपसंचालक रवींद्र माने, विजयकुमार बरबडे, डॉ. लालासाहेब तांबडे तसेच बार्शीतील सीताफळ उत्पादक नवनाथ कसपटे, सुर्डीचे धनाजी शेळके, काळेगावचे उमेश देशमुख, मोहोळ तालुक्‍यातील पाथरीचे समाधान भोसले व सावळेश्‍वरचे धनाजी गावडे आदी उपस्थित होते. 

संवादाची सुरुवात पंतप्रधान मोदींनी नमस्कार मंडळी, कमाल केलीय तुम्ही सगळ्यांनी अशी मराठीतूनच केली. महिलांनी महिला शेतकऱ्यांसाठी स्थापन केलेली राज्यातील ही पहिलीच कंपनी आहे. 585 महिला कंपनीच्या सभासद आहेत. दूध उत्पादन, भाजीपाल्यासह तूर उत्पादनात कंपनीच्या सभासदांनी आघाडी घेतली असल्याचे सौ. माळगे यांनी सांगितले. पूर्वीचे उत्पन्न आणि आताचे उत्पन्न यातील फरक काय, असे प्रश्‍न पंतप्रधान मोदी यांनी विचारले. शेतकरी कंपन्यांना आयकरातून सूट दिल्याचेही मोदी यांनी स्पष्ट केले. हातमाग उद्योग ही सोलापूरची ओळख असूनही सध्या शेतीच्या चांगल्या प्रयोगासाठी सोलापूर प्रसिध्द होत आहे. ही निश्‍चितच कौतुकास्पद बाब आहे, असे सांगताना देशातील अन्य शेतकऱ्यांनीही सोलापूरच्या या कंपनीचा आर्दश घ्यावा, असे आवाहन मोदींनी देशवासियांना केले.

Web Title: pm modi talking in conference with solapur farmer