पंतप्रधान मोदींच्या 'मन की बात'मुळे प्रेरणा मिळते : सुभाष देशमुख

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 29 एप्रिल 2018

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आजचा 'मन की बात' कार्यक्रम सहकार, पणन व वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख यांनी दक्षिण सोलापूर तालुक्यातील होटगी गावात ग्रामस्थांसोबत ऐकला.

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आजचा 'मन की बात' कार्यक्रम सहकार, पणन व वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख यांनी दक्षिण सोलापूर तालुक्यातील होटगी गावात ग्रामस्थांसोबत ऐकला. या कार्यक्रमातून कामासाठी प्रेरणा व मार्गदर्शन लाभत असल्याचे प्रतिपादन सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी यावेळी बोलताना केले.

आकाशवाणीवर पंतप्रधान मोदी आपल्या 'मन की बात' कार्यक्रमातून सर्व भारतीयांसोबत संवाद साधतात. यामध्ये पंतप्रधान त्यांचे विचार भारतवासीयांसमोर मांडत असतात. पंतप्रधान मोदींचे विचार प्रेरणादायी असून, त्यांच्या मार्गदर्शनामुळे आपल्या कामाला चांगली गती मिळते. पंतप्रधान मोदी यांनी भारताला सर्व शक्तिमान व विकसित राष्ट्र करण्याचे स्वप्न पाहिले आहे. ते स्वप्न सर्वांचेच आहे. त्याच्या पूर्तीसाठी या कार्यक्रमातून बळ मिळते, असे सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी होटगी येथे 'मन की बात' कार्यक्रम ऐकल्यानंतर उपस्थितांशी बोलताना सांगितले.

पंतप्रधान मोदी यांनी आजच्या 'मन की बात' कार्यक्रमात केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियान, योग साधना, जल सुरक्षा, क्रीडा इत्यादी क्षेत्रातील कौतुकास्पद घडामोडी आणि नजीकच्या काळात येणारे रमजान व बुध्द पौर्णिमासारखे सण आदी विषयांवर विचार मांडले. याप्रसंगी होटगीतील लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: PM Narendra Modi Man ki Baat gives Energy says Subhash Deshmukh