विषारी दारूप्रकरणी तिघांवर मनुष्यवधाचा गुन्हा

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 9 एप्रिल 2017

नगर - दरेवाडी (ता. नगर) येथील दोन तरुणांचा मृत्यूही विषारी दारूसेवनामुळे झाल्याचे तपासणी अहवालात स्पष्ट झाले. त्यामुळे भिंगार कॅंप पोलिसांनी शनिवारी नरसिंग बसप्पा बारबर (रा. सैनिकनगर, भिंगार), मोहन दुग्गल व सोनू दुग्गल (रा. तारकपूर) यांच्याविरुद्ध मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला.

मोहन व सोनू दुग्गल पांगरमल बनावट दारू प्रकरणातीलही आरोपी आहेत. दरेवाडी येथील युवराज रावसाहेब बेरड (वय 26) व दादासाहेब जगन्नाथ बेरड (वय 26) यांचा दारू पिल्यानंतर 11 फेब्रुवारीला मृत्यू झाला होता. त्या वेळी उत्तरीय तपासणी करताना पोलिसांनी दोघांचाही व्हिसेरा राखून ठेवला. त्याचा तपासणी अहवाल प्राप्त झाला असून, विषारी दारू पिल्यानेच दोघांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. ही दारू जिल्हा रुग्णालयातील कॅंटीनमध्ये तयार केल्याचेही उघडकीस आले आहे. याबाबत सुनील रावसाहेब बेरड (रा. दरेवाडी) यांच्या फिर्यादीवरून भिंगार कॅंप पोलिसांनी मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला.

Web Title: poison wine case crime

टॅग्स