पोलिसांनी स्वीकारले छिंदमच्या हकालपट्टी मागणीचे निवेदन 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 3 एप्रिल 2018

नगर : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी अपशब्द उच्चारल्याबद्दल श्रीपाद छिंदम याची महाराष्ट्र राज्यातून हकालपट्टी करण्याची मागणी आज शिवसन्मान महामोर्चातर्फे करण्यात आली.

त्या मागणीचे निवेदन आयोजकांनी शिवाजी महाराजांचे पुतळ्याजवळ ठेवले. ते निवेदन पोलिस निरीक्षक सुरेश सपकाळे यांनी महाराजांचे दर्शन घेवून स्वीकारले. या मागणीसाठी नगरमधील माळीवाडा बसस्थानक चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याजवळून मोर्चाला सुरूवात झाली. दिल्लीगेट भागातील श्रीपाद छिंदम याच्या घरापर्यंत नेण्याचा आयोजकांचा प्रयत्न होता. तथापि, पोलिसांनी मोर्चाला परवानगी नाकारली.

हा मोर्चा चौपाटीवर अडविण्यात आला. पोलिसांनी छिंदम याच्या घराकडे जाणारे रस्ते बॅरीकेट टाकून अङविले होते. त्यासाठी मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Web Title: police accepted chiddams Expulsion letter