लाच घेताना पोलिस जाळ्यात

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 12 डिसेंबर 2018

कोल्हापूर - मारहाणीच्या गुन्ह्यातील आरोपी व त्याच्या कुटुंबातील सदस्यांची अटक टाळण्यासाठी व जामीन मिळवून देण्यासाठी मदत करण्यासाठी दोन हजारांची लाच स्वीकारणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्याला आज लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. संजय लोभाजी नैताम (वय ३८, रा. पोलिस लाईन कसबा बावडा) असे त्याचे नाव आहे. राजारामपुरी पोलिस ठाण्यात आज दुपारी ही कारवाई झाली.

टेंबलाईवाडी येथील विक्रम शिवाजी कांबळे (वय ३६), तसेच यांचे वडील शिवाजी परशुराम कांबळे यांनी नातेवाईक संदीप कांबळे याच्याकडून दीड वर्षापूर्वी  ३० हजार रुपये उसने घेतले होते. या पैशावरून दोघांमध्ये वाद होता. सहा महिन्यांपूर्वी संदीप कांबळे त्याच्या घराच्या वास्तुशांतीची पत्रिका देण्यासाठी शिवाजी कांबळे याच्या घरी गेला असता त्याच्यांमध्ये वाद झाला.

यानंतर संदीप कांबळे याने विक्रम कांबळे यांच्यासह त्याच्या कुटुंबातील सदस्यांविरोधात राजारामपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्याच्या तपास पोलिस नाईक संजय नैतामकडे होता. या गुन्ह्यातील विक्रम कांबळेसह त्याच्या कुटुंबीयांची अटक टाळण्यासाठी व जामीन मिळवून देण्यासाठी मदत करण्यासाठी दोन हजारांच्या लाचेची मागणी विक्रम कांबळे याच्याकडे केली होती. कांबळे यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधून नैतामविरोधात तक्रार केली. लाचलुचपत विभागाने केलेल्या पडताळणीत नैताम याने लाचेची मागणी केल्याचे, तसेच लाच रक्कम घेऊन राजारामपुरी पोलिस ठाण्यात येण्यास सांगितल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज राजारामपुरी पोलिस ठाण्यात सापळा रचून नैताम याला दोन हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक केली.

Web Title: Police arrested in Bribe case