ऑनलाइन फसवणूक प्रकरणात एकाला पोलिस कोठडी 

ऑनलाइन फसवणूक प्रकरणात एकाला पोलिस कोठडी 

सोलापूर : झारखंडमध्ये राहणारा अजयकुमार लोकांना मोबाईलवर फोन करायचा.. मी बजाज फायनान्समधून बोलतोय.. ईएमआय कार्ड नूतनीकरण करायचे आहे.. असे सांगून बँक खात्याची माहिती घ्यायचा. ओटीपी नंबर विचारून ऑनलाइन शॉपिंग करायचा. मुंबईत राहणारा त्याचा मित्र पंकजकुमार मंडल याच्या पत्यावर ऑनलाइन शॉपिंग केलेल्या वस्तू यायच्या. त्यातल्या काही वस्तू तो अजयकुमारला पाठवायचा तर काही वस्तू पंकजकुमार विकायचा. अशाच ऑनलाईन फसवणूकीतील मोबाईल विक्री करण्यासाठी सोलापुरात आलेला पंकजकुमार पोलिसांच्या जाळ्यात अडकला.

अटक केलेल्या पंकजकुमार मंडळ (वय 23, रा. वरळी, मुंबई, मूळगाव रा. महादव्य, मोतीलेदा, बेंगाबाद, गिरेड्डी, झारखंड) याची पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. श्याम श्रीधर ढवळे (वय 45, रा. निर्मितीविहार, आदित्यनगर, विजापूर रोड सोलापूर) यांना एप्रिल महिन्यात अजयकुमार याने फोन केला होता. ओटीपी क्रमांक विचारून ढवळे यांच्या खात्यावरून एक लाख 11 हजार 970 रुपयांची ऑनलाइन खरेदी केली होती. या घटनेचा तपास गुन्हे शाखा व सायबर पोलिस ठाण्याचे पथक करीत होते. ऑनलाइन पैसे कुठे वळते झाले याची माहिती घेतल्यानंतर अजयकुमार आणि पंकजकुमार यांची नावे समोर आली. ऑनलाइन शॉपिंग केलेले दोन मोबाईल पंकजकुमार नावे डिलिव्हर झाले होते. 

झारखंडमध्ये राहणारा अजयकुमार ऑनलाइन शॉपिंग करून साहित्य घेत होता. पंकजकुमार काही वस्तू स्वत: विकायचा तर काही वस्तू अजयकुमारकडे पाठवायचा. पंकजकुमार मोबाईल विकण्यासाठी सोलापुरात येणार असल्याची माहिती पोलिसांनी कळाली. सोलापूर रेल्वे स्थानक परिसरात सापळा लावण्यात आला. पोलिसांनी पंकजकुमारला ताब्यात घेतल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्याकडे दोन मोबाईल सापडले आहेत. ही कारवाई गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक बाळासाहेब शिंदे, अजित कुंभार यांच्यासह सुभाष पवार, बाबू मंगरूळे, संतोष येळे, स्वप्नील कसगावडे अमोल कानडे, प्रवीण शेळकंदे यांच्या पथकाने केली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com