मंगळवेढा : पोलिसांकडून ग्रामपंचायत सदस्यांना मारहाण; उपोषणाचा इशारा

agitation
agitation

मंगळवेढा : मारहाण प्रकरणातील आरोपींच्या अटकेसाठी गेलेल्या मंगळवेढा पोलिस स्टेशनमधील पोलिस कर्मचाऱ्यांनी चौकात थांबलेल्या ग्रामपंचायत सदस्य सर्जेराव गाडे यास हकनाक मारहाण करण्याचा प्रकार शनिवारी रात्री तालुक्यातील नंदूर घडला असून, याबाबत या ग्रामपंचायत सदस्यांनी आपल्यावर मारहाण करणाय्रा पोलिसांवर कारवाई करण्यात यावी. अन्यथा 12 जूनपासून उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्या कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा पोलिस अधिक्षक यांना निवेदनाद्वारे दिला.

त्यांनी दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे, की येथे झालेल्या मारहाण प्रकरणातील आरोपीच्या अटकेसाठी पोलिस स्टेशनमधील सहाय्यक पोलिस निरीक्षक वैभव मारकड व त्यांचे सहकारी पोलीस तालुक्यातील नंदूर येथे आले असता ग्रा.सदस्य गाडे हे मोबाईल चा बॅलन्स टाकण्यासाठी भर चौकात थांबले असता पोलिसांनी त्यांच्याजवळ काट्यांनी व लाथा बुक्यानी हकनाक मारहाण केली. यावेळी त्याच्याजवळ असलेल्या दोन काट्या मोडल्या या काट्या घटनास्थळी तशाच आहेत या मारहाणी दरम्यान पोलिसांच्या तोंडाचा दारूचा वास येत होता असून याबाबत जखमी अवस्थेत न्यायासाठी पोलीस स्टेशनला गेल्यावर उपचारासाठी दवाखान्याची नावे देण्यास तब्बल तीन तास लावले. शिवाय फिर्याद दाखल करून घेतली नाही व संबंधित कारकूनाने मला तब्बल तीन तास ताटकळत ठेवले आहे. त्यामुळे या पोलिसांच्या हकनाक मारहानीच्या निषेधार्थ कुटुंबासमवेत 12 जून रोजी पोलीस अधिकारी यांच्या कार्यालयासमोर उपोषण करणार असल्याचे ग्रामपंचायत सदस्य गाडे यांनी निवेदनात नमूद केले आहे.

तालुक्यामध्ये अवैध धंदे सध्या महिला व अल्पवयीन मुली गायब होण्याचे प्रमाण जास्त आहे पण तपासयंत्रणा मात्र सुस्त आहे याकडे पोलिसांनी सोयीस्कररित्या दुर्लक्ष केले आहे परंतु सर्वसामान्य माणसाच्या सर्वसामान्य माणसाला पोलिसाच्या कायद्याचा धाक दाखवून आपण किती सक्षम आहोत हे दाखवण्याचा गंभीर प्रयत्न पोलिसांकडून होत आहे.या गंभीर प्रकाराबाबत काय कारवाई  करणार वरिष्ठ अधिकाय्राचा मोबाईलवर संपर्क साधला असता प्रतिसाद मिळाला नाही.

सदर मारहानी संदर्भातील निवेदन मला प्राप्त झाले असून प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पाहणी करून याबाबत चौकशी करून पुढील कारवाईची दिशा निश्चित केली जाईल.
- दत्तात्रय पाटील पोलिस उपअधिक्षक मंगळवेढा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com