पोलिस वसाहतीमध्ये अधिकारी कुटुंबात वाद 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 22 एप्रिल 2018

दोन पोलिसांतील वादानंतर बझार पोलिस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 

सोलापूर - पोलिस आयुक्तालयाजवळील वसंतनगर पोलिस लाईनमध्ये सहायक पोलिस निरीक्षक आणि पोलिस उपनिरीक्षकात वाद झाला. याप्रकरणी बझार पोलिस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 

सुरेखा देविदास करंडे (वय 36, रा. बिल्डिंग नं. 1, रूम नं. 7, वसंतनगर पोलिस लाईन, सोलापूर) यांच्या फिर्यादीवरून सहायक पोलिस निरीक्षक भांबड व त्यांचा मुलगा हर्ष (रा. पीएसआय बिल्डिंग, वसंतनगर, सोलापूर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर हर्षवर्धन विश्‍वास भांबड याच्या फिर्यादीवरून देविदास करंडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

सुरेखा करंडे यांचे पती देविदास करंडे हे पोलिस उपनिरीक्षक आहेत. तर हर्षवर्धन याचे वडील विश्‍वास भांबड हे सहायक पोलिस निरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. शुक्रवारी सकाळी हर्षवर्धन याची आर्यन करंडे याच्यासोबत क्रिकेट खेळण्यावरून बाचाबाची झाली होती. तो प्रकार मिटला होता. परंतु, आर्यनचे वडील देविदास करंडे हे मैदानात येऊन माझ्या मुलास का चिडवतोस असे म्हणून त्यांनी हर्षवर्धन यास विनाकारण हाताने गालावर चापट मारून शिवीगाळ केली. म्हणून हर्षवर्धन याने सदर बझार पोलिस ठाण्यात पोलिस उपनिरीक्षक करंडे यांच्याविरुद्ध फिर्याद दाखल केली. 

गेल्या दोन दिवसांपासून सहायक पोलिस निरीक्षक भांबड व त्यांचा मुलगा हर्ष हे करंडे यांच्या अल्पवयीन मुलीला व मुलाला गोल फेऱ्या मारुन अश्‍लील शब्द बोलत होते. त्यावेळी करंडे यांच्या पत्नीने भांबड यांना असे का बोलता असे विचारले असता भांबड त्यांना शिवीगाळ करून निघून गेले. त्यानंतर शुकवारी रात्री करंडे हे मुलांसोबत बाहेर जात असताना भांबड व त्यांच्या मुलाने दमदाटी केली म्हणून सदर बझार पोलिस ठाण्यात करंडे यांच्या पत्नीने फिर्याद दाखल केली आहे.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: In the police colony the officers family argues