पोलिस त्रास देण्यासाठी नाही, सुरक्षेसाठी - पोलिस आयुक्त तांबडे

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 11 एप्रिल 2018

सोलापूर - पोलिस जनतेच्या सोबत आहेत, जनतेकडूनही संयम आणि सहकार्याची अपेक्षा आहे. पोलिस सुरक्षेसाठी आहेत. ते त्रास देण्यासाठी नाहीत, उत्सव मंडळांनी ठरवले तर कोणताही गालबोट न लागता उत्सव साजरा होऊ शकतो, असे मत पोलिस आयुक्त महादेव तांबडे यांनी मंगळवारी व्यक्त केले. 

सोलापूर - पोलिस जनतेच्या सोबत आहेत, जनतेकडूनही संयम आणि सहकार्याची अपेक्षा आहे. पोलिस सुरक्षेसाठी आहेत. ते त्रास देण्यासाठी नाहीत, उत्सव मंडळांनी ठरवले तर कोणताही गालबोट न लागता उत्सव साजरा होऊ शकतो, असे मत पोलिस आयुक्त महादेव तांबडे यांनी मंगळवारी व्यक्त केले. 

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 127 व्या जयंतीनिमित्त पोलिस आयुक्तालयात शांतता कमिटीची बैठक घेण्यात आली. या वेळी महापालिका आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे, पोलिस उपायुक्त अपर्णा गीते, सहायक पोलिस आयुक्त डॉ. दीपाली काळे व्यासपीठावर उपस्थित होते. बैठकीस रिपाइं आठवले गटाचे राज्य सरचिटणीस राजा सरवदे, कवाडे गटाचे प्रदेशाध्यक्ष राजा इंगळे, ऍड. संजीव सदाफुले, नगरसेवक आनंद चंदनशिवे, अजित गायकवाड, माजी उपमहापौर प्रमोद गायकवाड, नगरसेवक रवी गायकवाड, के. डी. कांबळे, डी. एन. गायकवाड, गवई गटाचे प्रदेशाध्यक्ष सुबोध वाघमोडे, युवराज पवार, सिद्धेश्‍वर पांडगळे, ऍड. स्वप्नील सरवदे, शांतीकुमार नागटिळक, दत्ता वाघमारे, बाळासाहेब वाघमारे, मध्यवर्ती अध्यक्ष सत्यजित वाघमोडे, अतिश बनसोडे आदी उपस्थित होते. 

मिरवणुकीत काही पोलिस फौजफाटा घेऊन येतात, यामुळे गैरसमज होतो, अशी तक्रार उपस्थितांनी केली. यावर पोलिस आयुक्तांनी तुम्ही तुमच्या कार्यकर्त्यांना आवरा, मी उत्साही पोलिसांना आवरतो, असे सांगितले. 2016च्या जयंती उत्सवावेळी दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्याची विनंती या वेळी करण्यात आली होती. या वेळी महापालिका आयुक्तांनीही मार्गदर्शन केले. 

कायद्याची अंमलबजावणी करण्याचे काम पोलिस करत असतात. सर्वांनी कायद्याच्या चौकटीत राहून डॉल्बीमुक्त उत्सव साजरा करावा. मंडळांनी ध्वनिप्रदूषण नियमांचे पालन करावे. 
- महादेव तांबडे, पोलिस आयुक्त

Web Title: police commissioner mahadev tambade