पोलिस मामाची अंतराळवीरांना समज 

सिद्धार्थ लाटकर
शुक्रवार, 19 जुलै 2019

चंद्रावर मानवाने पहिले पाऊल ठेवले त्यास नुकतीच 50 वर्षपुर्ण झाली. त्याचा धागा पकडत एका छायाचित्राच्या माध्यमातून नागरीक मुलभुत सुविधांबाबत चर्चा करीत आहेत.
 

सातारा ः साताऱ्यातील रस्ते आता रस्ते राहिलेले नाहीत. त्यांची अवस्था चंद्राच्या पृष्ठभागा सारखी झालेली आहे. त्यामुळे अंतराळवीरही रस्ता चुकून साताऱ्यात उतरत आहेत असे उपहासात्मक छायाचित्र सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. 
सातारकरांच्या मागे लागलेले रस्त्यांवरील खड्यांचे ग्रहण काही सुटण्याचे नाव घेत नाही. चक्क वर्षभरात बनविलेल्या रस्त्यांनाही खड्यांना ग्रासले आहे. त्यामुळे या कामांचा दर्जा जनतेसमोर उघडा पडला आहे. परंतु "खाबुगिरी'च्या तालात तो पालिकेतील सत्ताधारी, प्रशासनाला दिसत नसल्याने साताराकरांच्या नशिबी दचकेच आले आहेत असे नुकतेच ई-सकाळच्या माध्यमातून साताऱ्याच्या रस्त्यांची अवस्था मांडली. त्याची दखल घेत नागरीकांनी ही वेगवेगळ्या माध्यमातून साताऱ्याच्या रस्त्यांबाबत तीव्र संताप व्यक्त केला.
चंद्रावर मानवाने पहिले पाऊल ठेवले त्यास नुकतीच 50 वर्षपुर्ण झाली. त्याचा धागा पकडत साताऱ्याच्या रस्त्यांबाबत एका छायाचित्राच्या माध्यमातून सोशल मिडीयावर सातारा पालिकेची खिल्ली उडविली जात आहे. या छायाचित्रात दोन अंतराळवीर खड्डे पाहत असताना पोलीस मामा त्यांना चंद्रावरचे खड्डे समजून तुम्हा जिथे उतरलात तो चंद्र नसून, पृथ्वी वरील सातारा शहरातील एक रस्ता आहे...चला पावती फाडा असे म्हणत आहेत.
याच छायाचित्रात एका कोपऱ्यात असलेल्या इमारतीस सातारा नगरपालिका असा बाण दाखविण्यात आला आहे. बहुतांश नागरीकांनी हे छायाचित्र व्हॉटसऍपवर, फेसबुकवर स्टेटस ठेवले आहे. तसेच सोशल मिडीयावर व्हायरल केले जात आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Police constable instructed to astronauts