केडगाव हत्याकांड, भानुदास कोतकरला शनिवारपर्यंत पोलिस कोठडी 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 15 मे 2018

नगर : केडगाव दुहेरी हत्याकांडातील संशयित आरोपी भानुदास एकनाथ कोतकर (वय 65, रा. केडगाव) याला शनिवारपर्यंत (ता. 19) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले.

केडगाव दुहेरी हत्याकांडात त्यास नगर ग्रामीण विभागाच्या पोलिस पथकाने काल (ता.14) सकाळी पुण्यातून अटक केली आहे. त्यात आज न्यायालयासमोर हजर करण्यात आले. 

शेवगाव येथील लॉटरीविक्रेता अशोक लांडे याच्या खूनप्रकरणात कोतकरला यापूर्वीच जन्मठेपेची शिक्षा झालेली आहे. मात्र, न्यायालयाने त्यास काही अटींवर औषधोपचारासाठी जामीन दिलेला आहे. दरम्यान, केडगाव येथील शिवसैनिकांच्या दुहेरी हत्याकांडप्रकरणात त्याचा सहभाग असल्याचा संशय आहे. त्याच्यासह पोलिसांनी आमदार संग्राम जगताप व 30 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्यातील नऊ जणांना आत्तापर्यंत अटक केलेली आहे. 

Web Title: police custody to bhanudas kotkar till saturday