पोलिस खाते चालविणार पेट्रोल पंप

Police department will run a petrol pump soon
Police department will run a petrol pump soon

कऱ्हाड - पोलिस कल्याण निधीसह पोलिस खात्याला कायमचे उत्पन्नाचे साधन उपलब्ध व्हावे, यासाठी जिल्ह्यात तीन ठिकाणी पोलिस दलातर्फे लवकरच पेट्रोल पंप सुरू केले जाणार आहेत. सातारा येथे पोलिस मुख्यालयासह जिल्ह्यात दोन पोलिस ठाण्यातंर्गत तीन पेट्रोल पंप सुरू केले जाणार आहे. त्यात कऱ्हाड, वडूज व पोलिस मुख्यालयात येथे लवकरच पेट्रोल पंप सुरू होत आहेत. भारत पेट्रोलियम कंपनीकडून पेट्रोल पंप सुरू करण्याच्या सगळ्या कागदोपत्री पूर्तता झाल्या आहेत. विशेष पोलिस महानिरिक्षक ते प्रस्ताव आले आहेत. प्रस्ताव त्यांच्या कार्यालयाकडून येथे लवकरच प्राप्त होतील त्यामुळे लवकरच प्रत्यक्षात पेट्रोल पंप सुरू होतील, असा अंदाज आहे.

पोलिस कल्याण निधीसाठी त्याचा चांगला फायदा होणार आहे. त्यामुळे त्याला पोलिस खात्यांच्या वरिष्ठ कारायलयाकडून मंजूरी अत्यावश्यक असते. तीही लवकरच मिळेल, असाही अंदाज आहे. पोलिस दलास कायमस्वरूपी उत्पन्नाचे साधन मिळावे. तसेच पोलिस कल्याण निधीसाठी त्याचा चांगला वापर करता यावा, यासाठी शासनाने योजना राबवली. त्यातंर्गत जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यात पेट्रोल पंप उभा करण्यात येणार आहेत. त्यासाठी सहा प्रस्ताव पाठवले जाणार आहेत. त्यापैकी तीन प्रस्ताव मंजूरीच्या अंतीम टप्प्यात आहेत. त्यात कऱ्हाड, वडूज व जिल्हा पोलिस मुख्यालय येथे त्याची उभारणी होणार आहे. त्यासाठी जागाही आरक्षीत करण्यात आली आहे. भारत पेट्रोलीयम कंपानीकडूनही त्याची पूर्तता करण्यात आली आहे. ते प्रस्ताव पोलिसांच्या वरिष्ठ कार्यालयात गेले आहेत. तेथे मंजूर होवून ते प्रस्ताव लवकरच येथे मिळणार आहेत. ती अंतीम मजूरी आल्यानंतर प्रत्यक्षात पेट्रोल पंप सुरब होणार आहेत. त्यासाठी पोलिस खात्यातंर्गत मंजूरीची आता प्रतिक्षा उरली आहे. काही दिवसात तीही मंजूर मिळून प्रत्यक्षात पेट्रोल पंप सुरूही होतील.

प्रथम कऱ्हाडच्या कार्वे नाका येथील जागेत पेट्रोल पंप सुरू होणार आहे. त्यानंतर वडूजला परेडच्या मैदानाची पेट्रोल पंपासाठी आरक्षीत केली आहे. जिल्हा पोलिस मुख्यालयातील बाहेर आत्ताचे पार्कींग जेथे आहे. त्या ठिकाणी पेट्रोल पंपाची जागा आरक्षीत आहे. जिल्ह्यात सहा ठिकाणी पेट्रोल पंपाचे प्रस्ताव तयार आहेत. त्यापैकी वरील तीन प्रस्ताव पाठवून देण्यात आले आहेत. त्यांना शासन, पेट्रोल पंपाची कंपनीस्तारवार मंजूरी मिळाली आहे. कल्याण निधीसाठी अशल्याने पोलिस खात्यातंर्गत परवानगी शिल्लक आहे. तीही मिळेल, त्यामुळे कऱ्हाड, वडूज व पोलिस मुख्यालयात पेट्रोल पंप होणार असल्याचे निश्चीत झाले आहे. अन्य तीन ठिकाणचे प्रस्तावही तयार आहेत. वरील तीन पेट्रोल पंप प्रत्यक्षात सुरू झाले की, ते तीन प्रस्ताव पाठवण्यात येणार आहेत. त्यात ओगलेवाडी (कऱ्हाड), लोणंद व पुसेगाव येतील पोलिस ठाण्यांच्या त्यात समावेश आहे. त्या त्निही ठिकाणीजागा पाहण्याचे काम पूर्ण झाले आहे. पंपासाठी आत्यावश्यक आहे, तेवढी जागा तेथे उपलब्ध असल्याचे पहिल्या टप्प्यात स्पष्ट झाले आहे. त्यामुळे त्याही ठिकाणचे प्रस्ताव लवकरच पाठवले जाणार आहेत.

'सातारा जिल्हा पोलिस दलातर्फे तीन प्रश्ताव पाठवण्यात आले आहेत. त्याला मंजूरी घेण्याचे काम सुरू आहे. पोलिस खात्यातील काही महत्वाच्या मंजूरी बाकी आहेत. त्या मिळाल्या की, पोलिस खात्याचे पेट्रोल पंप सुरू होतील. त्याला काही अवधी जाईल.' अशी माहिती साताऱ्याचे जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com