तुरुंगातून पलायनाच्या प्रयत्नातील आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

हुकूम  मुलाणी
मंगळवार, 4 डिसेंबर 2018

मंगळवेढा : येथील कारागृहात असलेल्या आरोपी दादा दिगंबर लेंडवे (वय 46) ने कारागृहावरून बेडशीटचे तुकड्यांच्या साहय्याने उडी मारून पळून गेला. त्याला आज सकाळी कागष्ट येथून ताब्यात घेतले. आरोपीच्या अटकेनंतर पोलिसांनी सुटकेचा निश्वास सोडला.

मंगळवेढा : येथील कारागृहात असलेल्या आरोपी दादा दिगंबर लेंडवे (वय 46) ने कारागृहावरून बेडशीटचे तुकड्यांच्या साहय्याने उडी मारून पळून गेला. त्याला आज सकाळी कागष्ट येथून ताब्यात घेतले. आरोपीच्या अटकेनंतर पोलिसांनी सुटकेचा निश्वास सोडला.

या घटनेची हकीकत अशी की, तालुक्यातील लेंडवे चिंचाळे येथील टमटमच्या वादातील खून प्रकरणातून 2012 पासून आरोपी दादा दिगंबर लेंडवे (वय 46) हा कारागृहात आहे. सोमवारी पहाटे 5 वाजताच्या दरम्यान शौचालयाला जाण्याचा बहाणा करून बेडशिटचे तीन तुकड्याची गाठ मारून त्याच्या साहय्याने सबजेलच्या भिंतीवरून उडी मारून पलायन केले. यास पोलीसांनी श्वान पथक पाचारण केले. पण हे पथक होनमाने गल्ली पर्यंत गुठमळत राहिल्याने येथून हा आरोपी मोटर सायकलवरून पळून गेल्याचा अंदाज व्यक्त करून चार पथकाव्दारे त्याचा तपास सुरू केला.

मरवडे परिसरात शोध कार्य चालू असताना कागष्ट येथे फिरत उपनिरीक्षक दत्तात्रय पुजारी यांना मिळाली. पोलीस पथक त्या ठिकाणी गेले असता काकेकर वस्तीजवळील रस्त्यावरून पोलिसांना पाहून पळून जात असताना त्याचा पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले. ही कारवाई पोलीस अधिक्षक  मनोज पाटील, अप्पर पोलीस अधिक्षक मोज मोहिते, उपअधिक्षक दिलीप जगदाळे, पोलीस अनिल गाडे, यांच्या सुचनेनुसार सहायक पोलीस निरिक्षक वैभव मारकड, उपनिरीक्षक दत्तात्रय पुजारी अन्य पोलीसांनी ही कारवाई केली.

Web Title: Police detained the accused in the attempt to escape from prisone