"कोरोना'ची दुसरी लाट थोपवण्यास पोलिस, डॉक्‍टर रस्त्यावर 

Police, doctors on the streets to stop the second wave of Corona
Police, doctors on the streets to stop the second wave of Corona

तासगाव : दीपावलीचे औचित्य साधत तासगावचे पोलीस व डॉक्‍टर रस्त्यावर उतरले. शहरातील विविध चौकात फिरून, हाती फलक घेऊन मास्क नसणाऱ्यांना दंड करण्याऐवजी स्वतःजवळचे मास्क देत येऊ घातलेल्या कोरोनाच्या धोक्‍याविषयी प्रबोधन केले. उपविभागीय पोलिस अधिकारी अश्विनी शेंडगे, पोलीस निरीक्षक राजेंद्र सावंत्रे, युनायटेड बी.ए.एम.एस डॉक्‍टर (तासगाव) चे डॉ. ज्ञानेश्वर शिवणकर व डॉक्‍टर्स यांनी सहभाग घेतला. 

कोरोनाचे सावट दूर सारत लोक दीपावली साजरी करीत आहे. रस्त्यावर गर्दी वाढत आहे. कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्‍यता तज्ञ व्यक्त करत आहेत. यापार्श्वभूमीवर हा उपक्रम राबवण्यात आला. विटा नाका, बस स्थानक चौक, वंदे मातरम चौक, बागणी चौक, सिद्धेश्वर चौक, जोशी गल्ली, गणपती मंदिर, गुरुवार पेठ, शिवाजी पुतळा मार्गावरून पोलीस आणि डॉक्‍टरांनी प्रबोधन फलक घेऊन फेरी काढली. 

मास्क नसणाऱ्यांना मास्क देऊन, मुले-वृद्धाना मार्केटमध्ये घेऊन न येण्याविषयी डॉक्‍टरांनी प्रबोधन केले. पंकज पवार, विश्रांत मदने, डॉ. शब्बीर मुलाणी, डॉ. देविका पाटील, डॉ. ज्योती पाटील, डॉ. साहिल जमदाडे, डॉ. स्वप्निल ठोंबरे, डॉ. अण्णासाहेब पाटील, डॉ. तोफिक मुजावर, डॉ. विजय माने, डॉ. मीनल देशपांडे, डॉ. रेखा पाटील, डॉ. स्वाती पाटील, डॉ. जहीर नदाफ, डॉ. मिलिंद जाधव, डॉ. संतोष पाटील, डॉ. वैभव बरगाले, डॉ. प्रशांत पाटील, डॉ. सुनिल पाटील, मुकुंद पाटील, डॉ. प्रसाद देशपांडे यांच्यासह पोलिस, होमगार्ड उपस्थित होते.


संपादन : प्रफुल्ल सुतार 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com