पर्यटकांच्या मदतीला पोलिस

पर्यटकांच्या मदतीला पोलिस

कोल्हापूर - अंबाबाई मंदिराला कसे जायचे? राहण्यासाठी खात्रीलायक हॉटेल्स्‌ कोठे आहे? पार्किंग कोठे करायचे? जिल्ह्यातील प्रेक्षणीय स्थळांना जायचे कसे?... असे विविध प्रश्‍न पडणाऱ्या पर्यटकांना आता घाबरून जाण्याची गरज नाही. त्यांच्या मदतीसाठी आता पोलिस धावून येणार आहेत. शहरात लवकरच ‘पोलिस पर्यटन मदत कक्षाची’ सुरुवात होत आहे. कोल्हापूर परिक्षेत्रातील हा दुसरा प्रयोग असणार आहे. याच बरोबर सांगली, सातारा, सोलापूर, पुणे ग्रामीण भागातही अशी सुविधा केली जाणार आहे. यासाठी पोलिस उपअधीक्षकांमार्फत त्याचे नियोजन सुरू झाले आहे.

देशभरातून लाखो पर्यटक कोल्हापुरात करवीर निवासिनी अंबाबाई, जोतिबा दर्शनाला येतात. जिल्ह्यातील पन्हाळा, राधानगरी, दाजीपूर आदी ऐतिहासिक, प्रेक्षणीय स्थळांनाही भेटी देतात. नवख्या ठिकाणी जाताना खाण्या-पिण्यापासून राहण्याची सोय होईल की नाही ही शंका पर्यटकांच्या मनात येते. कोल्हापूर शहरात येणाऱ्या पर्यटकांच्या बाबतीत ही असेच घडते. ताराराणी चौकातून प्रवेश केल्या केल्या पर्यटक वाहनातूनच अंबाबाई मंदिराचा रस्ता कसा, याची विचारणा करू लागतात. मध्यवर्ती बसस्थानक, रेल्वे स्टेशनवर येणाऱ्या पर्यटकांची हीच परिस्थिती असते.

पर्यटक बिंदू चौकातील 
पार्किंग कोठे आहे, भोजनासह राहण्यासाठी चांगले हॉटेल्सची विचारणा करतात. आपल्या सोबत फॅमिली असल्याचेही ते आवर्जून सांगतात. प्रेक्षणीय स्थळांना जाणारे जवळचे मार्ग ते विचारतात. रस्त्यावरील अनोळखी व्यक्तीने दिलेल्या माहितीचाच आधार पर्यटकांना घ्यावा लागतो. अशा व्यक्तीने दिलेली चुकीची माहिती आणि केलेली दिशाभूल पर्यटकांना घातक ठरू शकते. मात्र, विश्‍वास ठेवावा, असा खात्रीची व्यक्ती त्यांना उपलब्ध होत नाही. पर्यटकांची अशीच अवस्था वेगवेगळ्या शहरांत होते.

पर्यटकांच्या याच अडचणी, समस्यांबाबत पोलिसांशी झालेल्या चर्चेतून, अभ्यासातून विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील मदत केंद्र ही संलल्पना प्रत्यक्षात आणली आहे. गोव्यात अशा पद्धतीची केंद्रे आहेत. परिक्षेत्रात महाबळेश्‍वर येथे त्याचा प्राथमिक प्रयोग झाला आहे. आता लवकरच कोल्हापूर शहरात ‘पोलिस पर्यटन मदत कक्षा’ची सुरुवात होत आहे.  शहर पोलिस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर यांच्या मार्फत त्याचे काम पाहिले जाणार आहे. शहरात तीन ठिकाणी ही केंद्रे सुरू करून पर्यटकांच्या अडचणी पोलिस सोडविणार आहेत. आवश्‍यक त्या ठिकाणी तातडीची मदतही या कक्षाद्वारे पोलिस करणार आहेत. 

शहरात तीन पर्यटन कक्ष 
कोल्हापूर शहरात येणाऱ्या पर्यटकांच्या अडचणी जागेवरच सोडविण्यासाठी ताराराणी चौक, दसरा चौक आणि बिंदू चौक या ठिकाणी पोलिस पर्यटन मदत कक्ष सुरू करण्यात येणार आहेत. 

महाबळेश्‍वर येथे पर्यटकांसाठी मदत केंद्राचा प्रयोग यशस्वी ठरला आहे. त्याच धर्तीवर कोल्हापुरात लवकरच पोलिस पर्यटन मदत कक्ष सुरू करण्यात येणार आहे. पोलिस उपअधीक्षकांच्या मार्फत याचे नियंत्रण असणार आहे. संपूर्ण परिक्षेत्रात असे मदत कक्ष सुरू करण्याचे नियोजन आहे. 
- विश्‍वास नांगरे-पाटील, विशेष पोलिस महानिरीक्षक

पर्यटकांना मिळणारी मदत
शहरातील मंदिरासह प्रेक्षणीय स्थळांची माहिती
मार्गांसह स्थळांचा नकाशा
हॉटेल्स्‌, धर्मशाळेसह निवासस्थानांची माहिती
रेल्वे, एसटी, केएमटी बसचे विविध मार्ग
पर्यटकांच्या त्रासाबाबतच्या तक्रारींची दखल
आवश्‍यक त्या ठिकाणी पोलिसांची मदत

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com