पोलीसांनीच केले सहा कोटी लंपास

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 16 एप्रिल 2017

वारणानगर- पोलिस अधिकारी असल्याचा गैरफायदा घेऊन खोट्या तपासाच्या नावाखाली पोलिसांनी सहा कोटी रुपये लंपास केल्याची घटना वारणानगर येथे उघडकीस आली आहे.

वारणानगर- पोलिस अधिकारी असल्याचा गैरफायदा घेऊन खोट्या तपासाच्या नावाखाली पोलिसांनी सहा कोटी रुपये लंपास केल्याची घटना वारणानगर येथे उघडकीस आली आहे.

वारणानगर येथील शिक्षक कॉलनीमध्ये राहणारे बांधकाम व्यावसायिक झुंजार माधवराव सरनोबत यांच्या घरी हा प्रकार घडला. आरोपी मोहिद्दीन मुल्ला यांच्यासह इतर पाच आरोपी 13 मार्च रोजी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास तपास कामाचे नाव सरनोबत यांच्या घरात सांगून शिरले. खोटा तपास दाखवून धाक दाखवत आरोपींनी सहा कोटी रुपयांची रक्कम चोरी केली. या आरोपींमध्ये सहपोलिस निरिक्षक सुरज चंदनशिवे, पोलिस हवालदार दीपक पाटील, शंकर पाटील, प्रवीण भास्कर सावंत (रा. वासुद, जि. सांगोला), रवींद्र पाटील यांचा समावेश आहे. 
   
झुंजार माधवराव सरनोबत यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील शाहुवाडी विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी सूरज गुरव घटनेचा पुढील तपास करत आहेत. 

Web Title: police loot 6 crore from sangli builder