आमदार चंद्रकांत पाटील यांच्या घरासमोर बंदोबस्त 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 23 नोव्हेंबर 2019

सत्ता स्थापनेबाबत आज सकाळी धक्कादायक नाट्य घडले. तसे राजकीय क्षेत्रातील वातावरण तापले गेले. यातून शहर जिल्ह्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी अधिकाऱ्यांना आवश्‍यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या.

कोल्हापूर - राज्यातील सत्ता नाट्यात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या आमदार चंद्रकांत पाटील यांच्या घरासमोर पोलिस    बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. खबरदारीचा भाग म्हणून शहरातील मुख्य चौकात पोलिस बंदोबस्त, नाकाबंदीही करण्यात आली होती. 

सत्ता स्थापनेबाबत आज सकाळी धक्कादायक नाट्य घडले. तसे राजकीय क्षेत्रातील वातावरण तापले गेले. यातून शहर जिल्ह्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी अधिकाऱ्यांना आवश्‍यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या. त्यानुसार तातडीने आमदार चंद्रकांत पाटील यांच्या नाळे कॉलनीतील निवासस्थानासमोर तातडीने बंदोबस्त तैनात करण्यात आला. निवासस्थानासमोर तंबू टाकण्यात आला असून त्यात एक अधिकाऱ्यासह पोलिस होमगार्ड असा 15 जणांचा पोलिस बंदोबस्त येथे तैनात करण्यात आला आहे. हा बंदोबस्त राजकीय वातावरण शांत होई पर्यंत कायम ठेवण्यात येणार आहे.

शहरातही बंदोबस्त

दरम्यान दक्षतेचा भाग म्हणून आज दुपारी तीन वाजल्यापासून शहरात येणाऱ्या सर्व मार्गासह गर्दीच्या ठिकाणी पोलिसांनी नाकाबंदी केली. यात शहरात येणाऱ्या व शहरातून बाहेर जाणाऱ्या वाहनांची तपासणी करण्यात आली. त्याचबरोबर चौका चौकात पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. त्याचबरोबर शहरातील महत्वाच्या ठिकाणी पोलिसांची गस्तही सुरू होती. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Police Protection In Front Of MLA Chandrakant Patil House