तीन पानी पत्त्याच्या जुगारावर पोलिसांचा छापा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 13 नोव्हेंबर 2018

कऱ्हाड : तीन पानी पत्त्याच्या जुगारावर छापा टाकून पोलिसांनी जुगार खेळणार्‍या 15 जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून 19 हजारांच्या रोख रकमेसह तेरा मोबाईलसह अकरा दुचाकी जप्त केल्या आहेत. रोख रकमे व्यतिरिक्त पाच लाखांचा मुद्देमाल जप्त झाला आहे.पोलिस उपाधीक्षक नवनाथ ढवळे यांच्या पथकाने सायंकाळी पाचच्या सुमारास वारूंजी येथे छापा टकला.

पोलिसांची दिलेल्या माहितीनुसार, वारूंजी येथील बेघर वसाहत परिसरात तीन पानी पत्त्याचा जुगार सुरू आहे, अशी माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार उपअधीक्षक ढवळे आणि शहर पोलिस ठाण्याच्या स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक स्वप्नील लोखंडे यांच्या पथकाने छापा टाकला. त्यावेळी बेघर वसाहतीत जुगार सुरू होता. त्या अड्ड्यावर 15 जणांना ताब्यात घेतले. 19 हजारांच्या रोख रकमेसह मोबाईल, जुगाराचे साहित्य आणि दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. जप्त मुद्देमाल सुमारे पाच लाखांच्या आसपास आहे. छाप्यात जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची नोंद घेण्याचे आणि गुन्हा नोंदविण्याची प्रक्रीया रात्री उशीरापर्यंत सुरू होती.

Web Title: Police raids on gamblers