कऱ्हाडातील जुगार अड्ड्यांवर पोलिसांचा छापा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 7 मे 2018

कऱ्हाडातील सहा वेगवेगळ्या तीन पानी जुगार अड्ड्यांवर पोलिसांनी छापा टाकला.

कऱ्हाड - पोलिस उपाधीक्षक नवनाथ ढवळे यांच्या पथकाने तालुक्यातील वेगवेगळ्या ठिकाणी सुरू असलेल्या सहा वेगवेगळ्या तीन पानी जुगार अड्ड्यावर छापा टाकला. त्यात पोलिसांनी सुमारे 23 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. त्यात पाचजणांना अटक झाली आहे. एकजण पळून गेला आहे. करवडी, ओगलेवाडी, विरवडे येथे दुपारनंतर छापा सत्र झाले. त्याबाबातचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

दादासाहेब पिसाळ (वय 40), बबन होगले (45 ,रा. करवडी), लक्ष्मण सावंत (35, रा. विरवडे), अशोक जाधव (36, रा. करवडी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. मारूती पवार (रा. विरवडे) असे पळून गेलेल्याचे नाव आहे. करवडी येथील पहिल्या छाप्यात 10 हजार 300, दुसऱ्या छाप्यात दोन हजार 160, ओगलेवाडी येथील छाप्यात 700, विरवडे येथील छाप्यात 7 हजार 200, करवडी येथील तिसऱ्या छाप्यात एक हजार व जुगाराचे साहित्य एक हजार 600 असा 23 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Police raids on gambling bases in Karhad

टॅग्स