पोलिस भरती प्रक्रिया बायोमेट्रिक पद्धतीने

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 21 मार्च 2017

जिल्ह्यात पहिलाच प्रयोग - उद्यापासून प्रारंभ; व्हिडिओग्राफीचीही मदत

कोल्हापूर - जिल्ह्यात पोलिस भरतीच्या ६६ जागांसाठी ५८०० ऑनलाइन अर्ज दाखल झाले आहेत. त्याची भरती प्रक्रिया बुधवार (ता. २२) पासून पोलिस ग्राउंडवर सुरू होणार आहे. पहिल्यांदाच बायोमेट्रिक पद्धतीचा अवलंब करून ही प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. व्हिडिओग्राफी आणि पारदर्शक पद्धतीने ही प्रक्रिया केली जाणार असल्याचे गृह पोलिस उपअधीक्षक सतीश माने यांनी पत्रकारांना सांगितले. 

जिह्यात पोलिस भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने तब्बल ५८०० अर्ज दाखल झाले आहेत. बुधवारी सकाळी सहा वाजता भरतीची प्रक्रिया सुरू होणार आहे. पहिल्या दिवशी ५०० उमेदवारांची उंची, छाती व वजन तपासण्यात येईल. त्यातील पात्र उमेदवारांची बायोमेट्रिक नोंदणी करण्यात येईल.

त्यानंतर त्यांची गोळाफेक, लांब उडी, पुशप्स्‌ आणि १०० मीटर धावण्याची चाचणी घेण्यात येईल. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी सहा वाजता उमेदवारांची १८०० मीटर धावण्याची परीक्षा होईल. राजाराम साखर कारखान्यापासून त्याची सुरवात केली जाईल. या दिवसापासून दररोज इतर एक हजार उमेदवारांची शारीरिक चाचणी घेतली जाईल. परीक्षेसंदर्भात उमेदवाराला काही अडचण असल्यास त्या उमेदवाराला पोलिस अधिकाऱ्यांशी चर्चा करण्याची मुभा आहे. शारीरिक चाचणीनंतर पात्र उमेदवारांची लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे. अखेरीस एकास चार याप्रमाणे पात्र उमेदवारांची यादी लावण्यात येईल. या वेळी पात्र उमेदवारांच्या कागदपत्रांची छाननी करण्यात येईल, असे गृह पोलिस उपअधीक्षक माने यांनी सांगितले. 

असा आहे बंदोबस्त 
पोलिस निरीक्षक  - १०
सहायक पोलिस निरीक्षक - १९
पोलिस उपनिरीक्षक - २४
पोलिस कर्मचारी - २८०
जिल्ह्यात प्रथमच बायोमेट्रिक पद्धतीने ही भरती प्रक्रिया घेतली जाणार आहे. यामुळे गैरप्रकाराला आळा बसणार आहे. अत्यंत पारदर्शक पद्धतीने ही प्रक्रिया होणार आहे. उमेदवारांनी कोणत्याही आमिषाला बळी पडू नये. नोकरी लावण्याचे आमिष कोणी दाखवत असेल तर अशा व्यक्तीसंदर्भातील माहिती पोलिसांना द्यावी. 
- सतीश माने, गृह पोलिस उपअधीक्षक

Web Title: police recruitment process biometric process