पोलिस म्हणतात, हिंदी में बात करो...

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 21 ऑक्टोबर 2019

मतदान करायला कुठं जायचं..' असे मतदार विचारत असताना, केंद्रावरील पोलिस कर्मचारी बुचकळ्यात पडत होते. "क्‍या बोले, आप हिंदी मे बात करो..' असे सांगत होते. परराज्यातील पोलिस निवडणुकीच्या कामासाठी आल्याने मतदार व त्यांच्यात गमतीशीर संवाद रंगले होते.

नगर :  "मतदान करायला कुठं जायचं..' असे मतदार विचारत असताना, केंद्रावरील पोलिस कर्मचारी बुचकळ्यात पडत होते. "क्‍या बोले, आप हिंदी मे बात करो..' असे सांगत होते. परराज्यातील पोलिस निवडणुकीच्या कामासाठी आल्याने मतदार व त्यांच्यात गमतीशीर संवाद रंगले होते.

जिल्ह्यातील 12 मतदारसंघातील 3722 केंद्रांवर आज (सोमवारी) मतदान झाले. त्यासाठी 24 हजार 564 अधिकारी-कर्मचारी नियुक्त केले होते. जिल्ह्यातील 12 मतदारसंघांत एकूण 34 लाख 68 हजार मतदार आहेत. अनेकांना आपले मतदान केंद्र कोणते, याची माहिती नव्हती. त्यामुळे काहींनी तेथे उपस्थित असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांची मदत घेतली.

पाकिटे आली.. पाकिटे आली... 

केंद्राकडे कसे जायचे, असा प्रश्‍न ते विचारत होते. मात्र, त्यांचा प्रश्‍न परराज्यातील पोलिसांना समजत नव्हता. त्यातून मराठीमिश्रीत हिंदीत प्रश्‍न विचारताना मतदारांची तारांबळ उडत होती नि हास्याचे कारंजे फुलत होते. मराठी समजत नसल्याने कर्मचारी मतदारांना अंदाजे माहिती देत होते. पोलिसांसोबत झालेल्या संवादाचे किस्से बाहेर रंगले होते.

राज्यातीलच पोलिस हवेत
महाराष्ट्रातील मतदानासाठी येथीलच पोलिस बंदोबस्त असणे अपेक्षित आहे. परराज्यातील पोलिसांना मराठी समजत नसल्याने मतदारांचीही गोची झाली होती. एकमेकांची भाषा समजत नसल्याने त्यातून वाद उद्‌भवत होते. त्यामुळे काही मतदारांनी नाराजी व्यक्त केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Police says talk in Hindi ...