सोलापूर : दुधनीतील शांभवी डान्स बारवर छापा 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 21 फेब्रुवारी 2019

डान्सबारची माहिती मिळाल्यानंतर आयपीएस अधिकारी बगाटे हे पथकासह दुधनी येथे दाखल झाले. डान्सबारमध्ये महिला अश्‍लील हावभाव करत बिभत्स नृत्य करत होत्या. तिथे उपस्थित असलेले महिलांवर पैसे उधळत असल्याचे पोलिसांना दिसून आले. डान्सबार चालकांकडे असलेल्या परवान्याचे उल्लंघन केल्याचे दिसले.

सोलापूर : दुधनी (ता. अक्कलकोट) येथील शांभवी परमीट रुम ऍण्ड ऑर्केस्ट्रा बारमध्ये सुरू असलेल्या डान्स बारवर छापा टाकून आठ महिलांसह 13 जणांना अटक केली आहे. परिविक्षाधीन आयपीएस अधिकारी नितीन बगाटे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी अक्कलकोट दक्षिण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 

मंगळवारी (ता. 19) रात्री साडेनऊ वाजता ही कारवाई करण्यात आली. डान्सबारची माहिती मिळाल्यानंतर आयपीएस अधिकारी बगाटे हे पथकासह दुधनी येथे दाखल झाले. डान्सबारमध्ये महिला अश्‍लील हावभाव करत बिभत्स नृत्य करत होत्या. तिथे उपस्थित असलेले महिलांवर पैसे उधळत असल्याचे पोलिसांना दिसून आले. डान्सबार चालकांकडे असलेल्या परवान्याचे उल्लंघन केल्याचे दिसले.

पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या महिला मुंबई, नागपूर, हैदराबाद, बंगळुरू, पश्‍चिम बंगाल येथील आहेत. शिवानंद श्रीशैल कामगोंडा (वय 24, रा. ब्राह्मणगल्ली अफजलपूर, विजयपूर), शिवानंद गुरपादय्या हिरेमठ (वय 42, रा. दोळसंगी, ता. अफजलपूर), गुरुप्रसाद व्यंकटेश मूर्ती (वय 47, रा. जनतानगर, म्हैसूर), महादेव रामचंद्र कल्याणशेट्टी (वय 36, रा. बाळेनकेरी, विजयपूर), शरणप्पा नागप्पा म्हेत्रे (वय 44, रा. दुधनी ता. अक्कलकोट), सिद्धराम भवानीप्पा जळकी (वय 52, रा. दुधनी, ता. अक्कलकोट), सय्यद शरीफसाब सय्यद (वय 42, रा. मोईनपुरा, हैदराबाद), सोमनाथ हणमंत पाटील (वय 32, रा. आनंदनगर, गुलबर्गा), दीपक अबोनी मोहन देवनाथ (वय 44, रा. नॉर्थ हावडा, पश्‍चिम बंगाल), विश्‍वजित सुशील बर्मन (वय 42, रा. हाबरामणीपूर, वेस्ट बंगला), उज्वलघोष अनिलघोष घोष (वय 49, रा. बगाजतीन, कलकत्ता) यांच्यासह बार व्यवस्थापक बसवराज गुरुशांतप्पा ओनमशेट्टी (वय 31, रा. आळंद, जि. गुलबर्गा), मालक श्रीरामचंद्र धोंडप्पा गड्डी (वय 42, रा. मोहितेनगर, होटगी रोड, सोलापूर) यांना अटक करण्यात आली आहे.

Web Title: police seized dance bar in Solapur