पोलिस ठाण्यात मुलीबरोबर अश्‍लील वर्तन प्रकरणी कॉन्स्टेबलवर गुन्हा दाखल

पोलिस ठाण्यात मुलीबरोबर अश्‍लील वर्तन प्रकरणी  कॉन्स्टेबलवर गुन्हा दाखल

कोल्हापूर - पोलिस ठाण्यात अल्पवयीन मुलीबरोबर अश्‍लील वर्तन केल्याप्रकरणी कॉन्स्टेबल चेतन दिलीप घाटगे (वय ३४, रा. ४१०, मंडलिक पार्क) याच्यावर बाललैंगिक प्रतिबंधात्मक कायद्यान्वये विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

एका प्रकरणात जबाब घेताना मुलीशी जवळीक साधण्याचा प्रयत्न घाटगेने केल्याची फिर्याद संबंधित मुलीच्या आईने बुधवारी (ता. १५) सायंकाळी दिली आहे.

याबाबत पोलिस निरीक्षक सुनील पाटील यांनी दिलेली माहिती अशी - अल्पवयीन मुलगी बेपत्ता असल्याची फिर्याद तिच्या आई-वडिलांनी राजारामपुरी ठाण्यात पाच एप्रिलला नोंदवली. पोलिस त्या मुलीचा शोध घेत होते. ही मुलगी मंगळवारी (ता. १४) स्वतःहून ठाण्यात हजर झाली. तिच्या पालकांना बोलावण्यात आले. मी, माझ्या मैत्रिणीकडे पुण्यास राहायला गेले असल्याचे तिने सांगितले. याचा तपास पोलिस उपनिरीक्षक मीनाक्षी माळी करीत होत्या. संबंधित मुलीला दुसऱ्या दिवशी वैद्यकीय तपासणी, जबाब यासाठी पोलिस ठाण्यात येण्यास सांगितले होते. त्याप्रमाणे ती दुसऱ्या दिवशी तेथे गेली. या दिवशी माळी रजेवर होत्या. त्यामुळे पोलिस उपनिरीक्षक कांबळे यांना जबाब घेण्यास सांगितले.

या वेळी कॉन्स्टेबल चेतन घाटगे तेथे होता. काही कामासाठी कांबळे बाजूला गेल्यावर घाटगेने अश्‍लील चाळे केले असल्याचा आरोप संबंधित मुलीने केला आहे. त्यानंतर त्या मुलीला वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले. तेथून आल्यावर मुलीने हा प्रकार आपल्या आईला सांगितला. त्यांनी फिर्याद दिली. त्यानुसार काल रात्री घाटगेवर गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, आज घाटगे याला न्यायालयात दाखल केले असता त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली.

राजारामपुरी पोलिस ठाण्यातील कॉन्स्टेबलवर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. याबाबत तपास करून मगच कारवाई केली जाईल. 
- डॉ. अभिनव देशमुख,
जिल्हा पोलिस अधीक्षक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com