मुलींनो, धाडसी बना ! 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 3 फेब्रुवारी 2017

सांगली - मुलींच्या छेडछाडीचे प्रमाण वाढले आहे. मुली सुरक्षित नाहीत, असे म्हटले जाते. पण प्रत्यक्षात मुलींनी अत्याचाराचा सामना करण्यासाठी आपण किती सक्षम आहोत, याचा विचार होतो का? धाडसाने संकटावर मात करता येते. म्हणूनच धीट बनले पाहिजे, असे आवाहन पोलिस उपाधीक्षक डॉ. दीपाली काळे यांनी आज येथे केले. 

सावरकर प्रतिष्ठानच्या प्रज्ञा प्रबोधिनी प्रशालेतर्फे आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. समाजात नैतिकतेच्या प्रसारासाठी वर्षभर विविध उपक्रम राबविले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून डॉ. काळे यांनी मुलींशी संवाद साधला. प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय नामजोशी, संचालक नंदकुमार जोग, भास्कर कुलकर्णी प्रमुख उपस्थित होते. 

डॉ. काळे म्हणाल्या, ""समाजात मुली मुलांबरोबरीने प्रगती करीत आहेत. परंतु त्यांचे विचार मात्र साचेबद्ध चौकटीत आहेत. अत्याचाराचे प्रमाण वाढते आहे. आज अनेक मालिकांतून अनैतिकतेला नैतिकता म्हणून दाखवले जाते. त्याचाही परिणाम आजच्या पिढीवर होतोय. मग मुलींनी कसे वागले पाहिजे, कोणते कपडे घातले पाहिजे, हे सल्ले देण्यापेक्षा त्या धीट कशा बनतील हे सांगितले पाहिजे. धीट बनलात तर अत्याचाराचा सामना शक्‍य आहे. त्यासाठी संघटित व्हा आणि स्वयंसिद्ध बना.'' 

प्रज्ञा प्रबोधिनीचे मुख्याध्यापक विनायक परांजपे यांनी प्रास्ताविक केले. "अभिनव बालक'चे मुख्याध्यापक महादेव कुंभार, आदर्श शिशू विहारच्या मुख्याध्यापिका मंजिरी लिमये, मुग्धा गोखले, शर्मिली जगदाळे यांच्यासह शिक्षक उपस्थित होते. करुणा जोशी यांनी सूत्रसंचालन केले. नीलिमा कोप्पल यांनी आभार मानले.

Web Title: Police sub-inspector Dr. Deepali kale