...तर जिल्ह्याबाहेर बदलीचा प्रस्ताव! 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 23 मे 2018

पोलिस अधिक्षक कार्यालयातील महिला कक्ष, नियंत्रण कक्ष, जिल्हा विशेष शाखा, सुरक्षा शाखा, स्थानिक गुन्हे शाखा याठिकाणी नेमणुकीस असलेल्या महिला पोलिस कर्मचारी कामचुकारपणा करत असल्याचे निदर्शनास आले आहे.

सोलापूर - पोलिस अधिक्षक कार्यालयातील महिला कर्मचारी आपले काम सोडून इतर कार्यालयात जावून बसणे, मोबाईलवर जास्त वेळ बोलत असल्याचे दिसून आले आहे. यापुढे सुधारणा झाली नाही तर जिल्ह्याबाहेर बदलीचा प्रस्ताव देण्यात येईल असे आदेश पोलिस अधिक्षक वीरेश प्रभू यांनी काढले आहेत. 

पोलिस अधिक्षक कार्यालयातील महिला कक्ष, नियंत्रण कक्ष, जिल्हा विशेष शाखा, सुरक्षा शाखा, स्थानिक गुन्हे शाखा याठिकाणी नेमणुकीस असलेल्या महिला पोलिस कर्मचारी कामचुकारपणा करत असल्याचे निदर्शनास आले आहे. काही महिला कर्मचाऱ्यांचे दिलेल्या कामकाजाकडे लक्ष नसल्याचे प्रथमदर्शनी दिसत असल्याचे पोलिस अधिक्षक प्रभू यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे. संबंधित कार्यालयाच्या प्रमुख अधिकाऱ्यांनी कामचुकार महिलांना लेखी समज द्यावी. यापुढे जर कोणी महिला कर्मचारी अन्य शाखेत गेल्याचे किंवा मोबाईलवर अधिक वेळ बोलत असल्याचे निदर्शनास आल्यास जिल्ह्याबाहेर बदलीचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयास सादर करण्यात येईल, असेही पोलिस अधिक्षकांनी आपल्या आदेशात म्हटले आहे. 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Police superintendent Viresh Prabhu has ordered