सांगलीत हल्लेखोरांची पोलिसांनी काढली शहरातून धिंड

Sangli
Sangli

इस्लामपूर : खुनी हल्ला प्रकरणी अटक केलेल्या चौघा संशयितांची पोलिसांनी काल इस्लामपूर शहरातून पुन्हा धींड काढली. यावेळी नागरिकांनी गर्दी केली होती. पोलिसांच्या कारवाईचे शहरवासियांतून स्वागत होत आहे.

येथील व्यावसायिक जितेंद्र परदेशी यांच्यावर खंडणीसाठी हल्ला करण्याचा प्रयत्न करणार्‍या सोन्या शिंदे, नितीन पालकर, मुज्ज्या शेख, जयेश माने यांच्यावर गुन्हा दाखल करुन त्यांना अटक केली आहे. मंगळवारी या टोळक्याने शिराळा नाका परिसरात परदेशी यांच्यावर 40 हजार रुपये खंडणीसाठी जीवघेणा हल्ला केला होता. यावेळी परदेशी यांनी त्याच कोयत्याने सोन्या शिंदे याच्यावर प्रतिहल्ला केला होता.

परदेशी यांनी चौघाजणांविरोधात इस्लामपूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. काल पोलिस निरीक्षक विश्‍वास साळोखे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी संशयितांची शहरातील गांधी चौक, लाल चौक, शिराळा नाका, बसस्थानक परिसर, सावकर कॉलनी, संभाजी चौक अशी शहरभर धींड काढली. ज्या ठिकाणी हल्ल्याची घटना घडली त्या शिराळा नाका येथील घटनास्थळी संशयितांना नेऊन पंचनामा केला. धींड पाहण्यासाठी नागरिक, तरुणांनी मोठी गर्दी केली होती. पोलिसांच्या कारवाईचे शहरवासियांतून स्वागत होत आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com