पोलिस दलातील महिलेची साताऱ्यात आमहत्या 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 25 जून 2018

सातारा - मुंबई पोलिस दलात कार्यरत असलेल्या महिलेने कोंडवे (ता. सातारा) या आपल्या मूळ गावी विषारी औषध पिऊन आत्महत्या केली. स्वाती लखन निंबाळकर (वय 30, रा. कोंडवे, ता. सातारा) असे त्यांचे नाव आहे. शुक्रवारी रात्री त्यांनी विषारी औषध प्यायले होते. आज त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. आत्महत्येला कोणीही जबाबदार नसून स्वमर्जीने आत्महत्या करत असल्याचा जबाब त्यांनी दिला होता. 

बोरखळ (ता. सातारा) येथील स्वाती यांचा दोन वर्षांपूर्वी लखन निंबाळकर (रा. कोंडवे) यांच्याशी विवाह झाला होता. त्या मुंबईतील अंधेरी पोलिस ठाण्यात कार्यरत होत्या. लखन केंद्रीय राखीव पोलिस दलात कार्यरत होते. ते सुटीसाठी गावी आले होते. त्यामुळे स्वातीही गावी आल्या होत्या. शुक्रवारी त्यांनी विषारी औषध पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. कुटुंबीयांनी त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. याबाबतची माहिती मिळाल्यावर माहेरचे लोकही जिल्हा रुग्णालयात आले होते. दरम्यान आज पहाटे त्यांचा मृत्यू झाला. मृत्युपूर्वी स्वाती यांनी पोलिसांना जबाब दिला आहे. 

काही काळ तणाव 
दरम्यान, सासरच्या लोकांकडून छळ होत असल्यानेच स्वाती यांनी आत्महत्या केल्याचा आरोप माहेरच्या मंडळींनी केला, तसेच त्यांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, पोलिसांनी चौकशीनंतर कारवाई करण्याचे आश्‍वासन दिल्यानंतर मृतदेह ताब्यात घेण्यात आला. स्वाती व लखन यांना एक वर्षाचा मुलगा आहे. 

Web Title: police woman suicide in satara