'पोलीस भावाप्रमाणे महिलांच्या पाठीशी असतील'

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 26 मार्च 2018

मोहोळ पोलीस ठाण्याची वार्षिक तपासणी व सीसीटीव्ही लोकार्पण सोहळा आयोजीत केला होता त्यावेळी नांगरे पाटील बोलत होते यावेळी नांगरे पाटील यांच्या हस्ते फित कापुन प्राथमिक स्वरूपात सीसीटीव्ही लोकार्पण सोहळा पार पाडला

मोहोळ  - 'आपतीच्या काळात नागरीकांनी पोलीसांच्या पाठीशी रहावे. पोलीस पाटलांनी पोलीसांची भूमिका बजावावी. माहिला सुरक्षेसाठी आता महिलांनीच निर्भय बनावे. पोलीस भावाप्रमाणे त्यांच्या पाठीशी असतील. मोहोळ शहरातील सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे,' प्रतिपादन कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी केले 

मोहोळ पोलीस ठाण्याची वार्षिक तपासणी व सीसीटीव्ही लोकार्पण सोहळा आयोजीत केला होता त्यावेळी नांगरे पाटील बोलत होते यावेळी नांगरे पाटील यांच्या हस्ते फित कापुन प्राथमिक स्वरूपात सीसीटीव्ही लोकार्पण सोहळा पार पाडला. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक विरेश प्रभु उपविभागीय पोलीस अधिकारी अभय डोंगरे मिलिंद मोहिते भारतकुमार राणे पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के यांच्यासह मोहोळ पोलीस ठाण्यातील सर्व पोलीस उपनिरीक्षक सहायक पोलीस निरीक्षक पोलिस कर्मचारी तर नगराध्यक्ष रमेश बारसकर भाजपाचे तालुका अध्यक्ष सतीश काळे  सभापती समता गावडे नगरसेविका सिमा पाटील उद्योगपती वैभव गुंड संजय क्षिरसागर सोमेश क्षिरसागर हेमंत गरड प्रमोद डोके डॉ प्रमोद पाटील डॉ स्मिता पाटील संतोष गायकवाड बिलाल शेख बंटी आवारे यांच्यासह गावोगावचे महिला व पुरुष पोलीस पाटील उपस्थीत होते 

यावेळी पोलीस अधिक्षक विरेश प्रभु म्हणाले वाळु माफीया व इतर गुन्हेगाराच्या स्थानबद्दतेची सुरवात मोहोळ मधुनच केली आहे सर्वानी कायदा पाळावा व पालन करावे 

या वेळी नांगरे पाटील यांनी नागरिकांबरोबर संवाद साधुन समस्या जाणुन घेतल्या त्यात संजय क्षीर सागर यांनी दररोज पोलीस ठाण्यात जादा चकरा कोण मारतो कोण पोलीसांच्या कामात हस्तक्षेप करतो त्याचे सीसीटीव्ही फुटेज पाहुन कारवाई करावी अशी मागणी केली एम आय एम चे अध्यक्ष बीलाल शेख यांनी शहरातील लॉजवर अल्पवयीन मुली मुले राजरोस जातात त्याची चौकशी करून लॉजवर कारवाई करण्याची मागणी केली रिपब्लीकन पिपल फ्रंट चे धनंजय आवारे यांनी मोटार सायकलीवरील महापुरुषांचे फोटो व जातीय वादी मजकूर लिहीलेला असतो त्यामुळे जातीय तेढ निर्माण होते त्याला आळा घालण्याची मागणी केली डॉ स्मिता पाटील यांनी ग्रामिण भागातुन शिक्षणासाठी येणाऱ्या मुली व महिला यांना अद्याप ही सुरक्षा नाही त्यासाठी पोलीसांनी प्रयत्न करण्याची मागणी केली किशोर पवार यांनी अधिकाऱ्याशी जवळीक साधुन अiम्ही अधिकाऱ्याच्या किती जवळ आहोत त्यामुळे आमचे कोण काय करू शकत नाही ही प्रथा मोठ्या प्रमाणात आहे ती थांबविण्याची मागणी केली नगरसेविका सिमा पाटील सभापती समता गावडे हेमंत गरड आदीसह अन्य नागरीकांनी समस्या मांडल्या त्यांचे नांगरे पाटील यांनी उतरे दिली यावेळी सद्गुरू भवानी महाराज संस्थेच्या वतीने सीसीटीव्ही साठी अकरा हजाराची देणगी दिली 
 

Web Title: police would take care of women