रक्षाबंधनाला आलेल्या पोलिसाच्या बहिणीची चोरट्यांकडून लूट

संजय आ. काटे 
रविवार, 26 ऑगस्ट 2018

सीमा अनिल बंडगर राहणार बंडगरवाडी ( भिगवन ता. इंदापुर ) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांचे माहेर काष्टी येथील खरातवाडी आहे. त्यांचे बंधू कर्जत पोलिस ठाण्यात कार्यरत आहेत. रक्षाबंधन सणानिमित्त त्या काल शनिवारी माहेरी येत होत्या.

श्रीगोंदे, (नगर) : काष्टी ता. श्रीगोंदे येथे माहेरी रक्षाबंधनासाठी आलेल्या बहिणीला पोलिस खात्यात असलेल्या भावाचा अपघात झाल्याची बतावणी करुन अज्ञात चोरट्यांनी लूटल्याची खळबळजनक घटना शनिवारी (ता. २५) दुपारी झाली. याप्रकरणी रात्री उशिरा फसवणुक, रस्तालूटीचा गुन्हा श्रीगोंदे पोलिसात दाखल झाला.

सीमा अनिल बंडगर राहणार बंडगरवाडी ( भिगवन ता. इंदापुर ) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांचे माहेर काष्टी येथील खरातवाडी आहे. त्यांचे बंधू कर्जत पोलिस ठाण्यात कार्यरत आहेत. रक्षाबंधन सणानिमित्त त्या काल शनिवारी माहेरी येत होत्या. फिर्यादीत त्यांनी म्हटले आहे की, सासरवरुन बसने काल दुपारी त्या  साडेतीनच्या सुमारास काष्टीत उतरल्या. अजनुज चौकातील केळी गाडीजवळ थांबल्या असताना एक अनोळखी व्यक्ती घाबरलेल्या अवस्थेत जवळ येवून त्यांना म्हणाला की, तो पोलिस काथ्यात असून तुमच्या भावाचा अपघात झाला असून तुम्ही लगेच माझ्यासोबत चला. त्याने  घाईने त्याच्या मोटारसायकलवर बसवून दौंडच्या दिशेने घेवून निघाला. भावाचा अपघात झाला हे सांगितल्याने त्यांना काहीच सुचले नाही. मात्र सांगवीफाटा येथे गेल्यानंतर त्यांना संशय आल्याने गाडी थांबविण्यास सांगितले. मात्र पुढे साहेबांची गाडी असल्याचे सांगत नगर-दौंड रस्त्याच्या कडेला असणाऱ्या खडी-क्रेशरच्या ढिगाऱ्यापर्यंत मोटारसायकल नेली. त्या घाबरल्या मात्र काही समजण्यापुर्वीच त्यांनी ढिगाऱ्याच्या आडोशाचा फायदा घेत फिर्यादीला  टणक लाकडाने मारहाण सुरु केली. अंगावरील व बॅगेतील एक लाख दहा हजार रुपये किंमतीचे सोने-चांदीचे दागिने काढून घेवून तेथून त्याने ओरडण्यापुर्वीच पोबारा केला. 

याप्रकरणी पोलिसांनी तपास सुरु केला असला तरी एका पोलिस सहकाऱ्याच्या बहिणीला रक्षाबंधनाच्या पु्र्वसंध्येला लुटल्याने खळबळ उडाली आहे.

Web Title: Polices sisters robbery of robbers in Nagar