समस्या पाणी पुरवठ्याची अन् चर्चा शिंदेंच्या पराभवाची !

political debate when the discussion on the water issue was being discussed in Solapur Municipal Corporation
political debate when the discussion on the water issue was being discussed in Solapur Municipal Corporation

सोलापूर : सोलापूर शहर सुरु असलेल्या विस्कळीत पाणी पुरवठ्याच्या प्रश्नावरुन महापालिका सभेत घमासान चर्चा सुरु असताना त्यात राजकारण घुसले. काँग्रेसची सत्ता असतानाही शहरवासियांना पुरेशे पाणी देता आले नाही, त्यामुळेच सुशीलकुमार शिंदेंना लोकसभा निवडणुकीत दिड लाखांनी पराभव स्विकारावा लागला, असा उल्लेख भाजपाच्या नगरसेवकांनी केला. त्यामुळे काँग्रेसचे नगरसेवक चिडले व पाण्याच्या विषयात राजकारण केले तर आम्ही राजीनामे देतो ते स्वीकारा, असा इशारा त्यांनी दिला.

लोकसभेच्या निवडणुकीनंतर महापालिकेची पहिलीच सभा आज झाली. कोरम नसल्यामुळे महापौर शोभा बनशेट्टी यांनी सभा एक तासासाठी तहकूब केली. दुपारी साडेबारा वाजता सभा पुन्हा सुरु झाली. त्यावेळी सत्ताधारी भाजपसह सर्वच नगरसेवकांनी विस्कळीत पाणीपुरवठयावरुन प्रशासनाला धारेवर धरले. चर्चेदरम्यान गटनेते चेतन नरोटे यांनी आमच्या काँग्रेसच्या कालावधीत तीन दिवसाआडच पाणी पुरवठा होता पाणी मुबलक असतनाही चार किंवा पाच दिवसाआड पाणी पुरवठा करण्याची वेळ आली नव्हती. असे वक्तव्य केले. त्यास भाजपच्या नगरसेवकांनी आक्षेप घेतला. खरोखरच काँग्रेसच्या कालावधीत पुरेसे पाणी असते तर सुशिलकुमार शिंदे लोकसभा निवडणुकीत पराभूत झाले नसते अशी चर्चा सुरु केली. 

भाजपच्या नगरसेवकांनी केलेल्या शिंदेंच्या पराभवाचा उल्लेख काँग्रेस नगरसेवकांच्या वर्मी बसला. चिडलेल्या काँग्रेस नगरसेवकांनी पाणी पुरवठ्याच्या विषयात राजकारण आणू नका अन्यथा आम्हीही भाजपचे राजकारण उघडकीस आणू असे सांगितले तर नगरसेविका वौष्णवी करगुळे यांनी थेट राजीनामा देण्याचा इशारा दिला. अखेर यासंदर्भात सविस्तर माहिती घेऊन शहराला मुबलक पाणी पुरवठा कसा होईल याचे नियोजन केले जाईल असे महापौरांनी सांगितले त्यामुळे हा विषय थांबला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com