राजकीय नेत्यांमुळे शिक्षणाचे व्यावसायीकरण

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 18 जून 2018

पाथर्डी - शिक्षणाची पवित्र गुरुकुल पद्धती पूर्वजांनी सुरू केली. मात्र, राजकारण्यांनी शाळा सुरू केल्यानंतर त्याचे व्यावसायीकरण झाले. राजकारणाची कीड लागल्याने आपली माणसे चुकीच्या दिशेने गेली. बहुजन समाजाने राजकारणापासून दूर राहावे, असे आवाहन शिवस्मारक समितीचे प्रमुख आमदार विनायक मेटे यांनी केले.

कोरडगाव येथे राजे छत्रपती प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे उद्‌घाटन करताना मेटे बोलत होते. अभिनेत्री वर्षा उसगावकर प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.

'ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी शैक्षणिक संस्थेचे कार्य मोलाचे असते. मराठी माध्यमात शिक्षण घेतल्याने आपण स्पर्धेत कमी पडू, असा न्यूनगंड विद्यार्थ्यांनी ठेवू नये. मराठी माध्यमात शिक्षण घेऊनच मी व्यक्तिमत्त्व फुलविले,'' असे उसगावकर यांनी सांगितले.

Web Title: political leader education Commercialization