लग्नाचे मुहूर्त गाठताना नेतेमडंळीची मोठी 'दमछाक'

अक्षय गुंड
मंगळवार, 8 मे 2018

लग्नपत्रिकेतही नेतेमडंळीनी मानाचे स्थान 
लग्न सोहळ्याच्या पत्रिकेवर पुर्वी  देवदेवतांचे व वेगवेगळे फोटो असायाचे परंतु सध्या लग्नपत्रिका बदलली असुन नेतेमडंळीचे फोटो छापण्याची पध्दत रूढ झाली आहे. एकुणच लग्न सोहळ्यात देखील नेतेमडंळीचे वर्चस्व वाढलेले दिसत आहे.

उपळाई बुद्रूक (जि. सोलापूर) : सध्या ग्रामीण भागात लग्नसराई मोठ्या धुमधडाक्यात सुरू आहेत. उन्हांची तीव्रता वाढत असताना  या लग्न सोहळ्यांना पै-पाहुणे, मित्रमंडळी यांची मोठ्या प्रमाणात गर्दी दिसुन येत आहे. त्यामुळे लग्न सराई जल्लोषमय वातावरणात मोठ्या थाटामाटात साजरे होताना दिसत आहेत. लग्नाची शोभा वाढवण्यासाठी लग्न मालकांकडुन आग्रह करून नेतेमडंळीनां बोलवले जात आहे. कार्यकर्त्यांच्या इच्छेख्यातर नेते मंडळी ही वेळात वेळ काढून लग्न सोहळ्यास उपस्थिती दर्शवित आहेत. परंतु यात नेतेमडंळीची मात्र मोठी 'दमछाक' होत असल्याचे चित्र सध्या ग्रामीण भागात दिसत आहे.

लोकसभा व विधानसभा निवडणुकीचे पडघम ग्रामीण भागात वाजु लागले आहेत. त्याअंनुषगांने लग्न सोहळ्यास उपस्थित राहुन आपल्या कार्यकर्त्यांना खुष करण्याचे काम सर्वच नेते मंडळी करत आहेत. लग्नाला न जावे तर कार्यकर्ता नाराज होईल म्हणुन दिवसभरातीत सर्व वेळ नेतेमडंळी विवाह सोहळ्यासाठी खर्ची घालताना दिसत आहेत. परंतु लग्न सोहळ्याला एकाच दिवशी अनेक ठिकाणची निमंत्रण असल्याने उपस्थित दर्शविण्यासाठी नेतेमडंळीची पुरती 'दमछाक' होत आहे. दिवसभरात असलेल्या दहा ते बारा लग्न सोहळ्यात आपल्या जवळच्या कार्यकर्त्यांच्या लग्नास भेट देण्यास नेतेमडंळीना आटापिटा करावा लागत आहे. तर दुसरीकडे लग्न मालक (नेत्यांचा कार्यकर्ता) नेतेमडंळी आल्याशिवाय लग्न लावत नसल्याने नियोजीत वेळेपेक्षा लग्न उशीरा लागत असल्याचे चित्र सध्या ग्रामीण भागात आहे. दरम्यान नेतेमडंळीची उपस्थिती लग्न सोहळ्यांना लागत असल्याने 'आपला नेता आपल्यासाठी किती करतो अशी भावना' लग्न मालक असलेल्या कार्यकर्त्यांच्या मनात येत आहे. 

लग्नपत्रिकेतही नेतेमडंळीनी मानाचे स्थान 
लग्न सोहळ्याच्या पत्रिकेवर पुर्वी  देवदेवतांचे व वेगवेगळे फोटो असायाचे परंतु सध्या लग्नपत्रिका बदलली असुन नेतेमडंळीचे फोटो छापण्याची पध्दत रूढ झाली आहे. एकुणच लग्न सोहळ्यात देखील नेतेमडंळीचे वर्चस्व वाढलेले दिसत आहे.

Web Title: political leaders attend marriage ceremony