आयर्विन पुलावरून राजकारण तापले... आरोपांच्या फैरी

Politics heats up from Sangali Irwin Bridge ... 2 ways accusations
Politics heats up from Sangali Irwin Bridge ... 2 ways accusations

'गाडगीळ प्लॅन'नुसार पुलाला विरोधच : संजय बजाज

सांगली : कृष्णा नदीवर आयर्विन पुलाला समांतर पूल बांधण्यास आमचा विरोध नाही, मात्र सांगलीतील पेठा उद्‌ध्वस्त करून हा पूल बांधण्यास आमचा विरोध आहे. आधी विकास आराखड्यातील (डीपी प्लॅन) मंजुरीनुसार पूल बांधावा. "गाडगीळ प्लॅन'नुसार पूल आम्ही बांधू देणार नाही, अशी परखड भूमिका राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज यांनी पत्रकार बैठकीत जाहीर केली. 


कापडपेठ, सराफ पेठ, हरभट रस्ता पेठीतील व्यापाऱ्यांसोबत बैठकीनंतर त्यांनी ही भूमिका मांडली. ते म्हणाले,""आमदार सुधीर गाडगीळ खोटे बालून हा पूल रेट आहेत. त्यांच्या या भूमिकेमुळे कापडपेठेतील 47 दुकाने 80 टक्के उद्‌ध्वस्त होणार आहेत. अन्य दुकानांचे केवळ बाथरुम वाचतील. जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी कुणाचे व्यापार उद्‌ध्वस्त करून विकास होत नाही, हे समजून घेत या पुलाला स्थगिती दिली आहे. शहराच्या पेठांना धक्का न लागता वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी रिंग रोड हाच जगभरात पर्याय ठरला आहे. डीपीमध्ये तसाच आराखडा आहे. जयंत पाटील यांनी गाडगीळ यांना तेच समजावले होते, मात्र आता केवळ राजकीय हेतूने आमदार आंदोलन करत आहेत. हा पूल झाला तर कापडपेठेतून जाणारा रस्ता 60 फुटांचा करावा लागेल आणि तो आम्ही करून देऊ, अशी हमी तत्कालीन आयुक्तांनी आमदार गाडगीळ यांच्या सूचनेने केली होती. आता आमदार सांगतात, पेठेला काही होणार नाही. असे खोटे बालून चालणार नाही. एकदा कागदावर मंजुरी आली तर कुणीही पेठ वाचवू शकणार नाही.'' 


ते म्हणाले,""डीपी प्लॅननुसार लिंगायत स्मशानभूमीजवळ निघून शंभर फुटी रस्त्याला जोडणारा रिंगरोड आधी झाला पाहिजे. त्याला पेठांशी जोडणारा एक रस्ता केला की पेठांमध्ये ग्राहक येतील. या काळात आयर्विन पूल वाहतुकीला बंद ठेवण्याचा डाव मुद्दाम खेळला गेला आहे. जयंत पाटील यांच्याशी झालेल्या चर्चेनुसार आठवडाभरात हा रस्ता दुचाकीला खुला होईल आणि 10 एप्रिलपर्यंत पूल पूर्ण खुला होईल. त्यामुळे पेठेवर परिणामाचा डाव हाणून पाडला जाईल.'' 

गाडगीळ, दिनकरतात्यांचे एकमत करून मग बोलावे 

संजय बजाज म्हणाले, ""आमदार सुधीर गाडगीळ आणि माजी आमदार दिनकर पाटील यांनी आयर्विन पुलाला समांतर पूल कोणत्या बाजूला झाला पाहिजे, यावर आधी एकमत करावे. तो उत्तरेला करायचा की दक्षिणेला हे दोघांचे ठरले की मग व्यापाऱ्यांसोबत चर्चा आणि आंदोलने करावीत.'' 

समांतर पूलाचा माझा नव्हे, सार्वजनिक बांधकामचा प्लॅन : गाडगीळ

सांगली ः आयर्विनला समांतर पूल मंजूर करण्याचे काम मी केले आहे. तो कुठे बांधायचा हे सार्वजनिक बांधकाम विभागाने ठरवले आहे. तो माझा नाही, त्यांचा प्लॅन आहे. त्यामुळे संजय बजाज यांनी कापडपेठेचे नाव पुढे करून पुलाला विरोधाचा ढोल पिटू नये. त्यात कापडपेठेचे काहीही नुकसान होणार नाही, असे प्रत्युत्तर आमदार सुधीर गाडगीळ यांनी दिले. 


ते म्हणाले, ""समांतर पूल हा विकास आराखड्याचाच भाग आहे. तो हवेतून आलेला नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाने पूर्ण अभ्यास करून मांडणी केली आहे. कापडपेठेतील 60 फूट रस्ता द्यावा लागेल हा शोध कुठून काढला? हवा तर कापडपेठ हा नो व्हेईकल झोन म्हणून जाहीर करायचा असेल तर करावा, माझी हरकत नाही. तेथील दुकाने पाडावी लागतील, हा सरळ खोटा प्रचार आहे. तसे काहीही होणार नाही. उलट पेठांकडचा लोकांचा ओघ कमी झाला तर पेठा अडचणीत येतील. ती मोठी चूक ठरेल. पाचशे लोकांसाठी पाच लाख लोकांना वेठीस धरण्याचा प्रयत्न कुणीच करू नये.'' 


ते म्हणाले, ""हा पूल आयर्विनच्या उत्तर दिशेने झाला पाहिजे, ही माझी स्पष्ट भूमिका आहे. कारण, दक्षिण बाजूला मंदिरे आहेत. मंदिरे पाडायची आहेत का? चिंचबागेतील मैदानाचा मुद्दा थोडा बाजूला ठेवू, सांगलीवाडीत आणखी चार नवीन मैदाने करता येतील, मात्र सांगलीशी जोडणारा पूल इथे झाला तरच लोकांसाठी तो उपयुक्त ठरेल आणि बाजारपेठेला पुन्हा बळ येईल.'' 

संपादन : युवराज यादव 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com