सदाभाऊंना हात की शेट्टींना साथ...

उमेश बांबरे
बुधवार, 24 मे 2017

सातारा - स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी व प्रदेशाध्यक्ष, कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यात सुरू असलेल्या कलगीतुऱ्यामुळे जिल्ह्यातील ‘स्वाभिमानी’च्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांत अस्वस्थता आहे. खासदार शेट्टींना साथ देणार, की सदाभाऊंना हात दाखविणार यावर जिल्ह्यातील संघटनेचे भवितव्य अवलंबून आहे.

सातारा - स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी व प्रदेशाध्यक्ष, कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यात सुरू असलेल्या कलगीतुऱ्यामुळे जिल्ह्यातील ‘स्वाभिमानी’च्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांत अस्वस्थता आहे. खासदार शेट्टींना साथ देणार, की सदाभाऊंना हात दाखविणार यावर जिल्ह्यातील संघटनेचे भवितव्य अवलंबून आहे.

मूळचे शेतकरी संघटनेचे नेते (कै.) शरद जोशी यांच्या संघटनेत जिल्ह्यातील कार्यकर्ते वाढले. जिल्ह्यात शेतकरी संघटनेचे चांगले वारे होते. ऊसदराचे आंदोलन म्हटले, की पश्‍चिम महाराष्ट्रात कोल्हापूर, सांगलीनंतर साताऱ्याचे ऊसदराचे आंदोलन गाजत असे. कालांतराने नेत्यांतील वैचारिक मतभेदातून शेतकरी संघटनेची शकले झाली. स्वाभिमानी शेतकरी संघटना, बळिराजा शेतकरी संघटना, शेतकरी संघटना अशा प्रत्येक नेत्यांनी संघटना स्वतंत्र केल्या. सुरवातीला जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते स्वाभिमानी शेतकरी संघटनेसोबत राहिले; पण राजू शेट्टींशी फार काळ न जमल्याने रघुनाथदादांनी स्वतंत्रपणे शेतकरी संघटनेचे काम सुरू केले. त्यानुसार जिल्ह्यात शेट्टी व रघुनाथदादा अशी कार्यकर्त्यांची विभागणी झाली. आता जिल्ह्यात शेतकरी संघटनेत शरद जोशी विचारमंच, स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि बळिराजा शेतकरी संघटना अशा तीन तुकड्यांत शेतकरी संघटना विभागली आहे. ‘स्वाभिमानी’मध्ये शंकर शिंदे, संजय भगत या पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्ते कार्यरत आहेत. सदाभाऊ खोत यांनी राजू शेट्टींसोबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेत राहून आपले वेगळेपण सिद्ध केले. असे म्हणतात की सदाभाऊ खोत चालू लागले, की मोर्चा निघायचा, तर बोलायला लागले तर सभा सुरू व्हायची. त्यांची ही ताकद पाहून कार्यकर्तेही त्यांच्यासोबत राहिले. तसा राजू शेट्टींचा जिल्ह्यात संपर्क कमीच; पण अलीकडे कृषी व पणनमंत्री झाल्यापासून सदाभाऊंनी सातारा जिल्ह्यात संपर्क वाढविला आहे. त्यातच सहपालकमंत्रिपद त्यांच्याकडे आल्याने स्वाभिमानीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना बळ मिळाले. ते सदाभाऊंसोबतच वावरू लागले आहेत.  खासदार शेट्टी व मंत्री सदाभाऊ यांच्यात गेल्या काही दिवसांपासून कलगीतुरा रंगला आहे. यातून सदाभाऊ खोत वेगळा निर्णय घेणार, अशी चर्चा आहे. शेट्टी व खोत यांच्यातील कलगीतुऱ्यामुळे जिल्ह्यातील ‘स्वाभिमानी’चे कार्यकर्ते ही अस्वस्थ आहेत. त्यांच्यापुढे कोणता झेंडा घेऊ हाती अशी परिस्थिती निर्माण झाली आहे, तरीही सहपालकमंत्री झाल्यापासून ‘स्वाभिमानी’चे पदाधिकारी व कार्यकर्ते सदाभाऊंसोबत 

Web Title: politics in raju shetty & sadabhau khot