कर्नाटक राज्य वायव्य शिक्षक मतदार संघसह २२ जागांसाठी उद्या मतदान

विधान परिषद; पदवीधर, शिक्षक संघासाठी मतदान
Voting
VotingSakal

बेळगाव - कर्नाटक राज्य वायव्य शिक्षक व पदवीधर मतदार संघ मिळून २३ उमेदवारांचे राजकीय भविष्य उद्या (ता. १३) मतदान पेटीत बंद होणार आहे. यासाठी १९० केंद्रावर मतदान चालणार असून, सुमारे सुमारे १ लाख १५ हजार मतदार मतदानाचा हक्क बजावू शकणार आहेत. दरम्यान, यादिवशी सुरवातीला सकाळी ८ ते ४ यावेळेमध्ये मतदान होणार होते. मात्र, आता सायंकाळी ५ वाजेपर्यंत मतदान चालणार आहे.

राज्यातील राज्यसभा निवडणुकीचे निकाल घोषित झाल्यानंतर राजकीय पक्षांचे लक्ष आता विधान परिषदेकडे लागून राहिले आहेत. राज्यातील राजकीय घडामोडी आणि विधानसभा निवडणुकीची दिशा ठरविणाऱ्या या निवडणुकीच्या निकालाकडे लक्ष लागून आहे. यामुळे भाजप आणि कॉंग्रेस पक्षाने निवडणूक अत्यंत गंभीरपणे घेतली आहे. मतदारांशी संपर्क व मोटबांधणी कोणत्याही स्वरुपाची उणिव राहणार नाही, याची पुरेपूर खबरदारी घेतली गेली असल्याचे दिसते. शिवाय या कारणांनी उमेदवारांनी मतदार संघ पिंजून काढला. त्यासोबत नेत्यांच्या सभा मोठ्या स्वरुपात आयोजित करून पोषक वातावरण तयार करून घेतले. या कारणांनी यंदाची निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची आणि तितकीच चुरशीची ठरली आहे.

शिक्षक मतदार संघातून १२ उमेदवार निवडणुकीच्या आखाड्यात आहेत. पदवीधर मतदार संघातून ११ उमेदवार रिंगणात आहेत. दोन्ही मिळून २३ उमेदवार आहेत. यात शिक्षत मतदार संघात भाजपच्या उमेदवारीवर अरुण शहापूर व कॉंग्रेस उमेदवारीवर प्रकाश हुक्केरी रिंगणात आहेत. पदवीधर मतदार संघातून भाजप उमेदवारीवर हणमंत निराणी आणि कॉंग्रेस पक्षाकडून ॲड. सुनील संक आखाड्यात आहेत. या चार उमेदवारांच्या कामगिरीकडे लक्ष आहे.

मात्र, दोन्ही मतदार संघातून प्रादेशिक पक्षांचे उमेदवार आणि अपक्ष उमेदवारही निवडणूक रिंगणात आहेत. यात काही प्रमुख आणि त्यांचा जनसंपर्कही व्यापक आहे. यामुळे हे उमेदवार ‘जाएंट’ किल्लर ठरणार नाहीत ना? असा प्रश्‍न उपस्थित केला आहे. विधान परिषद जाहीर निवडणूक प्रचाराची सांगता शनिवारी सायंकाळी झाली आहे. त्यानंतर उमेदवारांनी खऱ्या अर्थाने अधिक जोर मतदारांची मोट बांधणी आणि गुप्त बैठकावर दिला आहे. थेट संपर्क, कार्यकर्ते किंवा दूरध्वनीद्वारे संपर्क साधून मतदानाची याचना केली जात आहे. तसेच शिक्षक मतदार संघ व पदवीधर मतदार संघातील मतदारांची संख्या वेगवेगळी आहे. त्यासाठी नेत्यांना वेगवेगळ्या स्वरुपाची तयारी या निवडणुकीच्या निमित्ताने सुरु आहे.

१९० केंद्रावर मतदान

बेळगाव - ९५

बागलकोट - ४८

विजापूर - ४७

उमेदवार

कर्नाटक वायव्य पदवीधर*११

कर्नाटक वायव्य शिक्षक*१२

मतदान - १३ जून

वेळ - सकाळी ८ ते सायंकाळी ५

मतमोजणी - १५ जून

वेळ - सकाळी ८ वाजल्यापासून

स्थळ - ज्योती कॉलेज, बेळगाव.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com