RiverPollution : जयंती नाल्यातील प्रदुषित पाणी फळ्या घालून रोखणार 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 17 जुलै 2019

कोल्हापूर - पावसाने ओढ धरल्याने जयंती नाल्यातील काळेकुट्ट पाणी पंचगंगेत मिसळत आहे. हे प्रदुषित पाणी नदीच्या दिशेने जाऊ नये, यासाठी फळ्या घालण्याच्या कामाला गुरुवारपासून (ता. 18) सुरवात होत आहे. आठ गाळ्यांत 40 फळ्या घालण्याचे काम दोन दिवस चालेल. 

पावसाळ्यात पाण्याला वाट करून देण्यासाठी फळ्या घातल्या जातात. पूर्वी फळ्या लाकडी होत्या. अलीकडे त्या फायबरच्या फळ्या महापालिकेने तयार करून घेतल्या आहेत. जुलै हा भर पावसाचा महिना मानला जाते. मात्र, चार दिवसांपासून पावसाने धररेली ओढ चिंता वाढविणारी आहे. शहरातून येणारे सांडपाणी नदीच्या दिशेने जाते. पावसाअभावी जयंती नाल्यातील पाणी कमी झाले आहे. निव्वळ सांडपाणी नाल्यातून नदीच्या दिशेने जाऊ नये, यासाठी फळ्या घालण्याचे काम होणार आहे. त्यामुळे सांडपाणी कसबा बावडा येथील एसटीपीकडे प्रक्रियेसाठी वळविले जाईल. पावसाळ्यात फळ्या गालण्याची वेळ पहिल्यांदाच येऊन ठेपली आहे.  
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: polluted water of Jayanti Nala prevent to mix in Panchaganga