या फळाला पावसाच्या चुकीच्या नोंदींचा फटका

Pomegranate fruit hit the wrong record of rain
Pomegranate fruit hit the wrong record of rain

आटपाडी : यावर्षी पावसातील सुरवातीचा खंड आणि नंतर पडलेल्या अवकाळी पावसामुळे डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांचे या दशकातील सर्वात मोठे नुकसान झाले. मात्र, स्कायमेटने पावसाच्या चुकीच्या नोंदी केल्यामुळे विम्यापासून वंचित राहणार आहेत. विमा कंपनी स्कायमेटची का ? महसूलची पावसाची नोंद ग्राह्य धरून नुकसानभरपाई देणार, याकडे डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

आटपाडी तालुक्‍यात मृग बहारात जून आणि जुलै मध्ये बहुतांश शेतकरी बागेचा हंगाम धरतात. जवळपास दहा हजार एकर क्षेत्रावर हंगामात बागा धरल्या होत्या. यातील अनेकानी डाळिंबाचे विमा भरलेले आहे. विमा कंपनीच्या निकषानुसार पहिल्या दोन महिन्यांत 21 दिवसांपेक्षा जास्त पावसात खंड पडला तर खंडाच्या दिवसाप्रमाणे नुकसान भरपाईस शेतकरी पात्र होतात. तसेच एकाच वेळी 45 मिलिमीटर पाऊस पडला तर दुसऱ्या नुकसान भरपाईस पात्र होतात तसेच इतर रोग, अवकाळी पाऊस यामुळे ही नुकसान भरपाई द्यावी लागते. 

यावर्षी तालुक्‍यात 15 जून नंतर सलग तीस दिवस पावसामध्ये खंड होता. 15 ऑगस्ट नंतर सप्टेंबर, ऑक्‍टोबर मध्ये तीन वेळा 45 मिलिमीटरपेक्षा पाऊस पडला. तशी नोंद महसूलच्या पर्जन्यमापक आहे. या पावसामुळे डाळिंबाचे प्रचंड नुकसान झाले. बागा गेल्या किमान विमा रक्कम तरी मिळेल या आशेवर शेतकरी होते मात्र विमा कंपनीने स्कायमेटची पावसाची नोंद ग्राह्य धरली आहे. स्कायमेटने पावसात खंड दाखवला नाही तसेच तीन वेळा 45 मिलिमीटर वर पाऊस पडूनही नोंद केली नाही.

सप्टेंबर महिन्यात दीडशे मिलिमीटर पावसाची कमी नोंद दाखवली आहे. त्यामुळे शेतकरी विम्यापासून वंचित राहणार आहेत. यावरून श्रमिकचे आनंदराव पाटील यांनी आंदोलन करून लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. पालक मंत्री जयंतराव पाटील यांची भेट घेतली. शेतकऱ्यांना डाळिंबाचा विमा मिळणार का?, की स्कायमेटची पावसाची नोंद ग्राह्य धरून विमा कंपनी शेतकऱ्यांची फसवणूक करणार, याकडे लक्ष लागले आहे. 


अवकाळी पावसामुळे अतोनात नुकसान झाले. दर वर्षीच्या तुलनेत पंचवीस टक्केही उत्पादन निघाले नाही. उत्पादन खर्चही निघाला नाही.- गौरीहार पवार (शेतकरी. शेटफळे) 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com