डाळिंबाच्या बागा धोक्‍यात!

विशाल गुंजवटे
शनिवार, 18 ऑगस्ट 2018

बिजवडी - माण तालुक्‍यात अत्यल्प पडलेल्या पावसावर शेतकऱ्यांनी धाडसाने खरीप हंगामाची पेरणी केली आहे. पिके भरण्याच्या काळात पाणी नसल्याने खरीप हंगाम वाया जाण्याच्या मार्गावर असून डाळिंब फळबागांचीही तीच अवस्था आहे. पाणीटंचाई, तेल्या रोगाचा प्रादुर्भाव व कमी दर या संकटामुळे डाळिंबाच्या फळबागा धोक्‍यात आल्या आहेत. अनेक शेतकऱ्यांनी पाण्याअभावी डाळिंबाची फळे तोडून टाकली आहेत.
माण तालुक्‍यात तेल्या रोगामुळे शेकडो एकर बागा उद्‌ध्वस्त झाल्या आहेत.

तेल्या रोगाचा सामना करत अनेक शेतकऱ्यांनी मोठ्या धाडसाने कमी पाण्यावर डाळिंबाच्या फळबागा जगवल्या आहेत. थोड्याफार पडलेल्या पावसाच्या जिवावर अनेक शेतकऱ्यांनी डाळिंब फळबागेचा बहर धरला होता.

फळाची चांगली वाढ झाल्यानंतर पाण्याची गरज असताना पावसाने ओढ दिल्याने तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली. कमी पाण्यामुळे फळे व झाडे कोमेजू लागली आहेत. दोन वर्षांनंतर तेल्या रोगाचाही प्रादुर्भाव सुरू केल्याने अनेक बागांतील फळे तडकून खराब झाली आहेत. त्यावर मात करण्यासाठी शेतकरी प्रयत्नशील असताना डाळिंबाचेही पडलेले दर शेतकऱ्यांसाठी चिंतेचा विषय आहे. बिजवडी परिसरात अनेक शेतकऱ्यांनी फळबागेचा बहर धरलेला होता. मात्र, वातावरणात होणारा सतत बदल, पाणीटंचाई, तेल्या रोग यामुळे बहर वाया गेले आहेत. या बहरासाठी केलेला खर्चही वाया गेल्याने फळबाग लागवड शेतकरी आर्थिक अडचणीत आले आहेत. अनेक शेतकऱ्यांनी फळे तोडून टाकल्याचे चित्र दिसून येत आहे. डाळिंबाला २० ते २५ रुपये दराची सरासरी मिळत असल्याने जानेवारी महिन्यात धरलेल्या फळबागांचा खर्चही निघेनासा झाला आहे. उन्हाळ्यात पाणीटंचाई असते. त्यामुळे अनेक शेतकरी जून महिन्यात बहर धरतात. मात्र, त्यांचाही बहर वाया गेले आहेत.

हमीभाव देण्याची शेतकऱ्यांची मागणी
राज्य शासनाने डाळिंबाला हमीभाव देण्याबरोबरच तेल्या रोगापासून बचाव करण्यासाठी प्रभावी औषधांचे संशोधन व विशेष अनुदान देण्याची मागणीही डाळिंब फळबाग लागवडधारक शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

Web Title: pomegranate garden in danger