दाखल्याविना डाळिंब विम्याला खोडा

नागेश गायकवाड
सोमवार, 2 जुलै 2018

आटपाडी - विमा कंपन्यांनी डाळींबाचा विमा भरण्यासाठी तलाठी दाखल्याची अट घातली आहे. न्यायालयाच्या आदेशामुळे तलाठ्यांना दाखले देता येत नाहीत. त्यामुळे यावर्षी एक टक्काही शेतकऱ्यांना विमा भरता आला नाही.

आटपाडी - विमा कंपन्यांनी डाळींबाचा विमा भरण्यासाठी तलाठी दाखल्याची अट घातली आहे. न्यायालयाच्या आदेशामुळे तलाठ्यांना दाखले देता येत नाहीत. त्यामुळे यावर्षी एक टक्काही शेतकऱ्यांना विमा भरता आला नाही.

तलाठ्यांच्या दाखल्याने डाळिंबाच्या विमा भरण्याला खोडा बसला आहे.
डाळिंबाचा बहार सुरू झाला आहे. त्याचा विमा भरण्याची अंतिम मुदत पंधरा जुलै आहे. मृग बहार मोठ्या संख्येन धरला जातो. अनेक शेतकऱ्यांची कामे अंतिम टप्प्यात आहेत. डाळिंब विमा भरण्यासाठी शेतकऱ्यांत जागृती झाली आहे. मात्र विमा कंपन्यांनी कागदपत्रे, अटी घातल्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांना विमा भरता आलेला नाही. एक टक्काही शेतकऱ्यांना विमा भरता आला नाही.

विमा कंपन्यांनी विविध कागदपत्रासह डाळिंब लागवडीच्या तलाठी दाखल्याची अट घातली आहे. दुसरीकडे तलाठ्यांना असे दाखले देण्यास न्यायालयाने मनाई केली आहे. डाळिंब लागवडीचे दाखले मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांचा विमा बॅंका भरून घेत नाहीत. बॅंका तलाठ्याचा दाखला मागत आहेत. कृषी सहाय्यक किंवा कृषी अधिकाऱ्याचे दाखले स्वीकारले जात नाहीत. त्यामुळे डाळींब विमा भरण्यापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे.

लागणारी कागदपत्रे
 विमा फॉर्म
 ७/१२ उतारा
 लागवडीचा दाखला
 आधार झेरॉक्‍स
 मतदान कार्ड झेरॉक्‍स
 बॅंक पासबुक

दृष्टिक्षेपात
 आटपाडीतील डाळिंब 
लागवडीचे क्षेत्र- ९ हजार हेक्‍टर 
 शेतकऱ्याची संख्या- १० हजार 
 हेक्‍टरी विमा रक्कम- ६ हजार. 
 विम्याची अंतिम मुदत- १५ जुलै

तलाठी दाखले देत नाहीत तर बॅंका दाखल्याशिवाय विमा भरून घेत नाहीत. त्यावर मार्ग काढावा.
- दत्तात्रय गायकवाड, शेतकरी

Web Title: pomegranate insurance issue certificate